Good Morning Wishes : निर्णय चुकला तरी हरकत नाही, स्वतःवर विश्वास हवा! सकाळची सुरुवात करा प्रेरणादायी विचारांनी
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : निर्णय चुकला तरी हरकत नाही, स्वतःवर विश्वास हवा! सकाळची सुरुवात करा प्रेरणादायी विचारांनी

Good Morning Wishes : निर्णय चुकला तरी हरकत नाही, स्वतःवर विश्वास हवा! सकाळची सुरुवात करा प्रेरणादायी विचारांनी

Nov 07, 2024 08:30 AM IST

Good Morning Marathi Message :सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण होते. आजकाल बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी नवनवीन आणि सुंदर संदेश शोधतात.

Good Morning marathi Status
Good Morning marathi Status (freepik)

Good Morning Marathi Message : जेव्हा कोणी प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणतो तेव्हा दिवसाची सुरुवात अधिक छान होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण होते. आजकाल बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी नवनवीन आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला १० सर्वोत्तम संदेश सापडतील, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुप्रभात म्हणू शकता.

ठाम राहायला शिकावं,

निर्णय चुकला तरी हरकत नाही.

स्वतःवर विश्वास असला की,

जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

सुप्रभात!

 

 

प्रत्येकात काही विशेष गुण असतातच,

पण जर तुम्ही माश्याची परीक्षा त्याच्या,

झाडावर चढण्याच्या क्षमतेवर

करू लागलात, तर तुम्ही

सर्व आयुष्य त्याला मुर्खच समजत राहाल.

 

 

दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा.

तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील

एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.

शुभ सकाळ

 

 

तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता.

तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात,

तर दुर्बळ बनाल,

आणि सामर्थ्यशाली समजलात

तर सामर्थ्यशाली बनाल.

शुभ सकाळ

 

फुले नेहमी फुलत राहतात, 

ज्योत अखंड तेवत राहते.

आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात, 

त्यांना जोडा आणि आनंदी राहा!

शुभ सकाळ

 

 

आवडतं मला लोकांना नेहमी 

गुड मॉर्निंग म्हणायला

दूर असूनही मनाच्या कोपऱ्यात 

एकत्र साठवून ठेवायला

शुभ सकाळ

 

 

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,

नाजूक उन्हाची प्रेमळ साथ,

मंजुळ वाऱ्याची हळूवार हालचाल,

अशीच येवो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ!

 

 

रात्र ओसरली दिवस उजाडला,

तुला पाहून सूर्यही चमकला,

लखलखत्या किरणांनी झाडे लखाकली,

तुझ्याशी गुजगोष्टी करण्यासाठी पहाट उगवली!

शुभ सकाळ

 

 

अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते,

उन्हात फिरताना सावलीची गरज असते,

जीवनात जगताना चांगल्या माणसांची गरज असते,

माझ्या आयुष्यातील या चांगल्या माणसांना माझ्याकडून शुभ सकाळ!

 

 

नवा दिवस नवी सुरूवात,

नवी प्रेरणा आणि तुझी साथ,

आयुष्य सुंदर आहे तुझा हात हातात आहे,

परमेश्वराकडे मी यासाठी कृतज्ञ आहे! 

शुभ सकाळ

 

 

आकाशाला पुन्हा तांबडा रंग फुटलाय,

पांढऱ्या धुक्यातून सूर्य वर आलाय,

माझ्या मनात आनंदाचं सुंगध दरवळलाय,

कारण तुला भेटण्यासाठी आज पुन्हा नवा दिवस उगवलाय! 

शुभ सकाळ

 

 

एकच आस, एक विसावा

तुझा मेसेज रोज दिसावा

परमेश्वराकडे हिच प्रार्थना

तुझा सहवास कायम मिळावा!

शुभ सकाळ

Whats_app_banner