Good Morning Marathi Message: कुणाला चांगले विचार पाठवल्यानेही तुमच्या मनाला आनंद मिळतो. याशिवाय समोरच्या व्यक्तीचा दिवसही चांगला जाऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी चांगले विचार पाठवले, तर त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते. जीवनाचा अर्थ समजावून सांगणाऱ्या सुविचारांसह सुप्रभात संदेश पाठवून, समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मकता देता येते. तुम्हालाही रोजचा दिवस इतरांसाठी खास बनवायचा असेल, तर त्यांना खाली लिहिलेल्या सकाळच्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.
वयाचं काहीच देणंघेणं नसतं.
जिथे विचार जुळतात तिथेच,
खरी मैत्री होते…!
शुभ सकाळ
आयुष्यात लोक काय
म्हणतील याचा विचार कधीच
करू नका...
कारण आपले आयुष्य
आपल्याला जगायचं आहे.
लोकांना नाही…
शुभ सकाळ!
काळ कसोटीचा आहे…
पण कसोटीला सांगा वारसा
संघर्षाचा आहे...
आपली आणि आपल्या परिवाराची
काळजी घ्या…
गुड मॉर्निग
आनंद
हसायला शिकवतो
आणि समाधान
जगायला शिकवतं.
शुभ सकाळ!
प्रत्येक वस्तूची किंमत
वेळ आल्यावरच समजते,
निसर्गाकडून फुकट
मिळणाऱ्या ऑक्सिजनसाठीही
दवाखान्यात गेल्यावर पैसे
मोजावे लागतात…
शुभ सकाळ
विश्वास हा किती छोटा शब्द आहे,
वाचायला सेकंद लागतो,
विचार करायला मिनिट लागतो,
समजायला दिवस लागतो आणि,
सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागते!
शुभ सकाळ
सकाळ म्हणजे,
नवीन क्षणांची सुरुवात
जे घडून गेले आहे ते विसरून
येणाऱ्या नवीन क्षणांच स्वागत करणे.
आणि आपल्या सुंदर आयुष्याला
आणखीन सुंदर बनवणे…
शुभ सकाळ!
आयुष्य ही फार
अवघड शाळा आहे,
कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते …
शुभ सकाळ!
स्वतःचेही काही तत्व असावेत
आणि त्या तत्वांशी स्वतः प्रामाणिक असावे.
शुभ सकाळ
हे मतलबी युग चालू आहे,
इथे खरा माणूस झुरतो आणि खोटा मिरवतो,
पण लक्षात असुद्या एकदिवस
कर्माचा हिशोब नक्की होतो!
जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की,
आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत!
शुभ सकाळ
संबंधित बातम्या