Good Morning Marathi Message: एखाद्या व्यक्तीला चांगले विचार पाठवल्यानेही तुमच्या मनाला आनंद मिळतो. याशिवाय त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा दिवसही चांगला जाऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी चांगले विचार पाठवले, तर त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते. जीवनाचा अर्थ समजावून सांगणारे सुविचारांसह सुप्रभात संदेश पाठवून, समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मकता मिळते. तुम्हालाही तुमचा दिवस इतरांसारखा बनवायचा असेल, तर त्यांना खाली लिहिलेल्या सकाळच्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.
जर एखाद्यास आनंदी करण्याची संधी मिळाली तर सोडू नका,
देवदूत असतात ती माणसं जे दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी घेतात.
सुखद व मंगलमय दिवसाची शुभेच्छा!
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यंत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही!
हसत राहिलात तर सर्व जग तुमच्यासोबत आहे,
नाहीतर तुमच्या डोळ्यातील अश्रूंनापण डोळ्यामध्ये जागा नाही!
शुभ सकाळ
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजूक उन्हाची प्रेमळ साथ
मंजुळ वाऱ्याची हळूवार हालचाल
अशीच येवो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ
तुम्हा सर्वांना शुभ सकाळ!
रात्र ओसरली दिवस उजाडला
तुला पाहून सुर्यही चमकला
लखलखत्या किरणांनी झाडे लखाकली
तुझ्याशी गुजगोष्टी करण्यासाठी पहाट उगवली!
शुभ सकाळ
नवा दिवस नवी सुरूवात
नवी प्रेरणा आणि तुझी साथ
आयुष्य सुंदर आहे तुझा हात हातात आहे
परमेश्वरा मी यासाठी कृतज्ञ आहे!
शुभ सकाळ
आकाशाला पुन्हा तांबडा रंग फुटलाय
पांढऱ्या धुक्यातून सूर्य वर आलाय
माझ्या मनात आनंदाचं सुंगध दरवळलाय
कारण तुला भेटण्यासाठी आज पुन्हा नवा दिवस उगवलाय!
शुभ सकाळ
एकच आस, एक विसावा
तुझा मेसेज रोज दिसावा
परमेश्वराकडे हिच प्रार्थना
तुझा सहवास कायम मिळावा!
शुभ सकाळ
पहाटेच्या गारव्यात तुला मी आठवले
मैत्रींच्या गारव्यात पुन्हा पुन्हा साठवले
तुला भेटून बरेच दिवस झाले
आता तरी बास झाले तुझे बहाणे!
शुभ प्रभात
मैत्रीचा मोती प्रत्येकाच्या भाग्यात नसतो,
कारण समुद्रातही प्रत्येक शिंपल्यात तो नसतो,
जो नाती जपतो त्यांनाच तो सापडतो,
कारण खऱ्या मोत्यावर त्याचाच अधिकार असतो!
पहाटे पहाटे कळीचे फुल झाले,
पक्षी त्यांच्या प्रवासासाठी दूर आकाशात उडून गेले,
सूर्याचे आगमन होताच तारे चक्क लपून बसले,
तुझ्यासोबत स्वप्न पाहत मला कळलेच नाही रात्रीचे प्रहर कधी सरले!
शुभ सकाळ