Good Morning Marathi Message : या धावपळीच्या जगात चिंता आणि ताणतणाव सामान्य गोष्टी आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला सकारात्मक ऊर्जेची गरज असते. म्हणूनच आपल्या जवळच्या प्रिय व्यक्ती आणि मित्र सकाळी आपल्याला काही मौल्यवान संदेश पाठवतात. अशा वेळी तुम्हालाही एखाद्याच्या दिवसाची सुरुवात आनंदी करायची असेल. तर तुम्हीसुद्धा त्यांना सुंदर सुंदर शुभ सकाळचे मेसेज पाठवून शुभेच्छा देऊ शकता. तुमच्या प्रियजनांना संदेश पाठवण्यासाठी आम्ही काही खास मेसेज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.
शुभ सकाळ!
-----------------------------------
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे
कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात.
-----------------------------------
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका,
पावलो पावली येतील कठीण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
-----------------------------------
जीवनात जगतांना असे जगा की,
आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा,
आपली कोणीतरी आठवण काढली पाहिजे…
शुभ सकाळ!
-----------------------------------
पक्षी जेव्हा जीवंत असतो,
तेव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
पण जेव्हा पक्षी मरण पावतो,
तेव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा अपमान करू नका आणि
कोणाला कमीही लेखू नका.
शुभ सकाळ!
-----------------------------------
जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी,
अन सर्वात जास्त वेळा,
मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट
असेल तर ती म्हणजे विश्वास.
शुभ सकाळ!
-----------------------------------
बोलताना जरा जपून बोलावं,
कधी शब्द अर्थ बदलतात,
चालताना जरा जपून चालावं,
कधी रस्तेही घात करतात,
झुकताना जरा जपून झुकावं,
कधी आपलेच खंजीर खुपसतात,
पाउल टाकताना जरा जपून टाकावं,
कधी फुलेही काटे बनतात,
मागताना जरा जपून मागावं,
कधी आपलेच भावं खातात,
आणि नाते जोडताना जपून जोडावं,
कधी नकळत धागेही तुटून जातात.
सुप्रभात
-----------------------------------
स्वप्ने डोळ्यांत साठवून ठेवू नयेत,
कदाचित ती अश्रूंबरोबर वाहून जातील…
ती हृदयात जपून ठेवावीत,
कारण हृदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पूर्ण करण्याची
प्रेरणा देईल!
-----------------------------------
सौंदर्य कपड्यात नाही,
तर कामात आहे.
सौंदर्य नटण्यात नाही,
तर विचारांमधे आहे.
सौंदर्य भपक्यात नाही,
तर साधेपणांत आहे.
सौंदर्य बाहेर कशात नाही,
तर मनांत आहे.
शुभ सकाळ