Good Morning Wishes : ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका! प्रियजनांना सकाळी पाठवा प्रेरणादायी मेसेज
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका! प्रियजनांना सकाळी पाठवा प्रेरणादायी मेसेज

Good Morning Wishes : ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका! प्रियजनांना सकाळी पाठवा प्रेरणादायी मेसेज

Dec 26, 2024 07:37 AM IST

Good Morning Marathi Message: तुम्हालाही एखाद्याच्या दिवसाची सुरुवात आनंदी करायची असेल, तर तुम्हीसुद्धा त्यांना सुंदर सुंदर शुभ सकाळचे मेसेज पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Message (Unsplash)

Good Morning Marathi Message: या धावपळीच्या जगात चिंता आणि ताणतणाव सामान्य गोष्टी आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला सकारात्मक ऊर्जेची गरज असते. म्हणूनच आपल्या जवळच्या प्रिय व्यक्ती आणि मित्र सकाळी आपल्याला काही मौल्यवान संदेश पाठवतात. अशा वेळी तुम्हालाही एखाद्याच्या दिवसाची सुरुवात आनंदी करायची असेल, तर तुम्हीसुद्धा त्यांना सुंदर सुंदर शुभ सकाळचे मेसेज पाठवून शुभेच्छा देऊ शकता. तुमच्या प्रियजनांना संदेश पाठवण्यासाठी आम्ही काही खास मेसेज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका,

स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका,

पावलो पावली येतील कठीण प्रसंग

फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन

जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका!

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

 

 

पक्षी जेव्हा जीवंत असतो,

तेव्हा तो किड्या मुंग्याना खातो.

पण जेव्हा पक्षी मरण पावतो,

तेव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.

वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.

कोणाचा अपमान करू नका आणि

कोणाला कमीही लेखू नका.

शुभ सकाळ !

 

 

आयुष्यात लोक काय

म्हणतील याचा विचार कधीच

करू नका..

कारण आपले आयुष्य

आपल्याला जगायचं आहे.

लोकांना नाही…

!! शुभ सकाळ !!

 

 

काळ कसोटीचा आहे…

पण कसोटीला सांगा वारसा

संघर्षाचा आहे..

आपली आणि आपल्या परिवाराची

काळजी घ्या…

गुड मॉर्निग

 

 

प्रत्येक वस्तूची किंमत

वेळ आल्यावरच समजते,

निसर्गाकडून फुकट

मिळणाऱ्या ऑक्सिजनसाठीही

दवाखान्यात गेल्यावर पैसे

मोजावे लागतात…

शुभ सकाळ

 

 

विश्वास

हा किती छोटा शब्द आहे

वाचायला सेकंद लागतो

विचार करायला मिनिट लागतो

समजायला दिवस लागतो आणि,

सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागते!

शुभ सकाळ

 

सकाळ म्हणजे,

नवीन क्षणांची सुरुवात

जे घडून गेले आहे ते विसरून

येणाऱ्या नवीन क्षणांच स्वागत करणे.

आणि आपल्या सुंदर आयुष्याला

आणखीन सुंदर बनवणे…

!! शुभ सकाळ !!

 

 

प्रत्येकात काही विशेष गुण असतातच

पण जर तुम्ही माश्याची परीक्षा त्याच्या

झाडावर चढण्याच्या क्षमतेवर

करू लागलात तर तुम्ही

सर्व आयुष्य त्याला मुर्खच समजत राहाल.

शुभ सकाळ

 

 

फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य

किरणांची आवश्यकता असते तसेच

मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या

विचारांची आवश्यकता असते!

गुड मॉर्निंग

 

 

चांगली माणस आपल्या जीवनात

येणं हे आपले भाग्य असते.

आणि त्यांना आपल्या जीवनात

जपून ठेवण्यासाठी आपल्याला

तितके योग्य असायला लागते.

 

 

लोक म्हणतात तू नेहमी

आनंदी असतोस….

मी म्हणालो दुसऱ्याच सुख

बघून मी जळत नाही,

आणि माझं दुःख कुणाला

सांगत नाही.

शुभ सकाळ

Whats_app_banner