Good Morning Wishes: नवा दिवस, नवे ध्येय! 'या' सुंदर गुड मॉर्निंग संदेशांसह करा दिवसाची सुरुवात
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: नवा दिवस, नवे ध्येय! 'या' सुंदर गुड मॉर्निंग संदेशांसह करा दिवसाची सुरुवात

Good Morning Wishes: नवा दिवस, नवे ध्येय! 'या' सुंदर गुड मॉर्निंग संदेशांसह करा दिवसाची सुरुवात

Aug 02, 2024 05:00 AM IST

Good Morning Marathi Message: तुम्हाला तुमच्यासोबत इतरांचा दिवसही गोड बनवायचा असेल तर तुम्ही शुभ सकाळच्या शुभेच्छा देऊन सुरुवात करू शकता.

good morning wishes
good morning wishes (shutterstock)

Good Morning Marathi Message:  एक ताजेपणा, एक विश्वास, एक नाविन्य... हीच एका चांगल्या दिवसाची सुरुवात आहे. दिवसाची सुरुवात नेहमी चांगल्या विचारांनी करावी. सकाळी उठल्याबरोबर तुमच्या मनात नकारात्मक विचार आले तर संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. जर तुम्हाला तुमच्यासोबत इतरांचा दिवसही गोड बनवायचा असेल तर तुम्ही शुभ सकाळच्या शुभेच्छा देऊन सुरुवात करू शकता. असे केल्याने, त्यांचा दिवस तर शुभ होईलच, शिवाय तुम्ही सकाळी उठल्याबरोबर लवकर त्यांचा विचार करत आहात या भावनेने त्यांचा आनंदही दुप्पट होईल. आणि तुमच्यातील नाते आणखी दृढ बनेल. त्यामुळेच तुमच्यासाठी काही खास गुड मॉर्निंग संदेश आम्ही दिले आहेत.

''वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…

आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात

गणपती दर्शनाने करूया…''

शुभ सकाळ !

 

''धावपळीच्या या जीवनात कोण

कोणाची आठवण काढत नाही

पण मला मात्र आपल्याला रोज

शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.''

शुभ सकाळ !

 

“माझ्यामुळे तुम्ही नाही ” तर “तुमच्यामुळे मी आहे”

ही वृत्ती ठेवा बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात

आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं

पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही.''

शुभ सकाळ!

 

स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,

कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे

कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच

स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे.

सुप्रभात!

 

जिव्हाळायाचे ऋणानुबंध

असल्याशिवाय कोणी कोणाच्या

आयुष्यात येत नाही.

सुप्रभात!

 

आपण जे देतो ते आपल्याकडे

परत येतं त्यामुळे चांगलं द्या,

चांगलच मिळेल.

शुभ सकाळ!

 

सोन्याचा साठा करुन मिळालेल्या

श्रीमंतीपेक्ष्या तुमच्या सारखा सोन्याहून

मुल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे ते खरे श्रीमंत…

गुड मॉर्निंग!

 

मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध

हा येणारच, आणि आपली

माणसे किती लांब असली

तरी आठवण ही येणारच…

गुड मॉर्निंग!

 

आवडतं मला त्या लोकांना

सकाळी गुड मॉर्निंग पाठवायला

जे माझ्या समोर नसून सुध्दा

माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे.

गुड मॉर्निंग!

 

आपुलकी असेल तर जीवन सुंदर

फुले असतील तर बाग सुंदर

गालातल्या गालात एक छोटस हसु असेल

तर चेहरा सुंदर आणि

नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर

शुभ सकाळ!

Whats_app_banner