Good Morning Marathi Message: कुणालाही चांगले विचार पाठवल्यानेही तुमच्या मनाला आनंद मिळतो. याशिवाय त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा दिवसही चांगला जाऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी चांगले विचार पाठवले तर त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते. जीवनाचा अर्थ समजावून सांगणारे सुविचार असलेले सुप्रभात संदेश पाठवून समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मकता मिळते. तुम्हालाही तुमचा दिवस इतरांसारखा बनवायचा असेल, तर त्यांना खाली लिहिलेल्या सकाळच्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.
आकाशाला पुन्हा तांबडा रंग फुटलाय,
पांढऱ्या धुक्यातून सूर्य वर आलाय,
माझ्या मनात आनंदाचं सुंगध दरवळलाय,
कारण तुम्हाला भेटण्यासाठी आजचा नवा दिवस उगवलाय!
शुभ सकाळ
आवडतं मला लोकांना नेहमी
गुड मॉर्निंग म्हणायला,
दूर असूनही मनाच्या कोपऱ्यात
एकत्र साठवून ठेवायला!
सुप्रभात
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साथ,
मंजुळ वाऱ्याची हळूवार हालचाल,
अशीच येवो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ!
शुभ सकाळ
निसर्ग आपल्याला देतो ते एक चेहरा
आणि आपण तयार करतो ती आपली ओळख!
शुभ सकाळ
नवा दिवस नवी सुरूवात,
नवी प्रेरणा आणि तुझी साथ,
आयुष्य सुंदर आहे तुझा हात हातात आहे
परमेश्वरा मी यासाठी कृतज्ञ आहे!
शुभ सकाळ
पहाटेच्या गारव्यात तुला मी आठवले,
मैत्रींच्या गारव्यात पुन्हा पुन्हा साठवले,
तुला भेटून बरेच दिवस झाले,
आता तरी बास झाले तुझे बहाणे!
शुभ प्रभात
स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला
दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही,
अशा सामर्थ्यशाली व्यक्तीला हरवण्याचे धाडस
नियतीसुद्धा कधीच करत नाही!
शुभ सकाळ
हे मतलबी युग चालू आहे,
इथे खरा माणुस झुरतो आणि खोटा मिरवतो,
पण लक्षात असुद्या
एकदिवस कर्माचा हिशोब नक्की होतो!
शुभ सकाळ
दगडात एक कमतरता आहे की,
तो कधी वितळत नाही,
पण एक चांगलेपणा आहे की,
तो कधी बदलत नाही.
शुभ सकाळ
त्या लोकांना डोक्यावर घेऊन कधीच मिरवू नका,
ज्यांची लायकी आपल्या पायाशी पण बसण्याची नसते!
कोमलता हा हृदयाच्या धर्म आणि सबलता हा देहाचा धर्म,
देहाला वज्रापेक्षाही अधिक मजबूत बनवा आणि
हृदयाला फुलापेक्षाही अधिक कोमल बनवा.
शुभ सकाळ