Good Morning Marathi Message : जेव्हा कोणी प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणतो तेव्हा दिवसाची सुरुवात अधिक छान होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण होते. आजकाल बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी नवनवीन आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला १० सर्वोत्तम संदेश सापडतील, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुप्रभात म्हणू शकता.
नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,
काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,
नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं,
नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं.
शुभ सकाळ!
नातं… म्हणजे काय…
ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.
आणि
कुणी काहीही सांगितलं म्हणुन तुटू नये…
असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं.
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
सुप्रभात!
माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,
तो इतरांची किती किंमत करतो,
यावरून त्याची किंमत ठरत असते.
शुभ सकाळ
स्वतःसाठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे...
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या,
कारण ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.
शुभ सकाळ
नाते सांभाळायचे असेल तर,
चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,
आणि नाते टिकवायचे असेल तर,
नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी...
शुभ सकाळ!
जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो,
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.
शुभ सकाळ!
यश आपल्याच हातात असतं.
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ.
होशील खूप मोठा,
स्वत:वर विश्वास ठेवून तर बघ.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाची सुरुवात,
नाजुक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ.
गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात…!