Good Morning Wishes : चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात... 'हे' मेसेज पाठवून द्या गुड मॉर्निंग शुभेच्छा!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात... 'हे' मेसेज पाठवून द्या गुड मॉर्निंग शुभेच्छा!

Good Morning Wishes : चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात... 'हे' मेसेज पाठवून द्या गुड मॉर्निंग शुभेच्छा!

Dec 07, 2024 07:46 AM IST

Good Morning Marathi Message: सकाळी उठल्याबरोबर एखाद्याला शुभ सकाळ बोलणे महत्वाचे असते. आपल्या एका मेसेजने एखाद्याचा संपूर्ण दिवस सकारात्मक बनतो.

Good Morning marathi Status
Good Morning marathi Status (freepik)

Good Morning Marathi Message: सकाळी उठल्याबरोरबर आपण मोबाईल पाहतो. अशात जर आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीचा मेसेज आला, आणि त्यांच्याकडून सकाळच्या शुभेच्छा मिळाल्या तर आपला दिवस चांगला जातो. त्यामुळेच सकाळी उठल्याबरोबर एखाद्याला शुभ सकाळ बोलणे महत्वाचे असते. आपल्या एका मेसेजने एखाद्याचा संपूर्ण दिवस सकारात्मक बनतो. अलीकडे अनेक लोक व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा विविध सोशल मीडियावर मेसेज पाठवून सकाळच्या सुंदर शुभेच्छा देत असतात.

चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि

चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..

मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.

शुभ सकाळ

 

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…

आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात

गणपती दर्शनाने करूया…

 

धावपळीच्या या जीवनात कोण

कोणाची आठवण काढत नाही

पण मला मात्र आपल्याला रोज

शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.

शुभ सकाळ!

 

 

वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,

एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला

तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही

कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी

कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे

एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,

म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.

सुप्रभात

 

 

परिस्थिती कशीही असो,

दोन गोष्टी सोबत असल्यावर आपल्याला

कोणीच हरु शकत नाही,

एक म्हणजे सत्य आणि दुसरे म्हणजे सातत्य.

सकाळच्या सुंदर शुभेच्छा…

 

आपली खरी स्वप्न तीच आहेत,

जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास

व सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

सकाळच्या सुंदर शुभेच्छा!

 

 

नात्यांना मधुर आवाजाची

अणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते …

गरज असते ती फक्त

सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची.

शुभ सकाळ!

 

 

नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल ,

तर तुटणे अवघड आहे आणि

जर स्वार्थाने झाली असेल ,

तर टिकणे अवघड आहे.

शुभ सकाळ

 

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,

ती आपोआप गुंफली जातात,

मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात

काहीजण हक्काने राज्य करतात,

यालाच तर मैत्री म्हणतात…

शुभ सकाळ!

 

 

सराव तुम्हाला बळकट बनवतो.

दुःख तुम्हांला माणूस बनवते..

अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,

यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते

परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची

प्रेरणा देत असते.

शुभ सकाळ!

Whats_app_banner