Good Morning: 'हसता खेळता घालवुया दिवसाचा...', या सुंदर संदेशाने प्रियजनांची सकाळ बनवा सकारात्मक
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning: 'हसता खेळता घालवुया दिवसाचा...', या सुंदर संदेशाने प्रियजनांची सकाळ बनवा सकारात्मक

Good Morning: 'हसता खेळता घालवुया दिवसाचा...', या सुंदर संदेशाने प्रियजनांची सकाळ बनवा सकारात्मक

Nov 10, 2024 09:10 AM IST

Good Morning Status: रात्रीचा एकटेपणा मोडून निघणारी सकाळची किरणे विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा भरू शकतात. दररोज एक नवीन सकाळ तुम्हाला नवीन बदलासाठी प्रेरित करते.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Message (pixabay)

Good Morning Marathi Message:  प्रत्येक नवीन सकाळ सकारात्मकतेचे आणि नवीन सुरुवातीचे संकेत असते. जीवनाचा कुठलाही पैलू किंवा वय कितीही असो, माणूस सकारात्मकतेच्या शोधात असतो. रात्रीचा एकटेपणा मोडून निघणारी सकाळची किरणे विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा भरू शकतात. दररोज एक नवीन सकाळ तुम्हाला नवीन बदलासाठी प्रेरित करते. मराठीतील गुड मॉर्निंग कोट्स वाचून, तुम्ही तुमचा दिवस प्रेरणा आणि सकारात्मकतेने सुरू करू शकता. दिवसाची सुरुवात चांगली होण्यासाठी सकाळी लवकर चांगले विचार वाचावेत. हे अनमोल विचार तुम्हाला या पोस्टच्या माध्यमातून वाचायला मिळतील. शिवाय तुम्ही तुमच्या प्रियजनांना हे संदेश पाठवून त्यांची सकाळसुद्धा सकारात्मक बनवू शकता.

 

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,

तो त्यालाच मिळतो;

जो स्वत:ला विसरून

इतरांना आनंदित करतो.

 

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,

एक मिनिट विचार करून,

घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.

शुभ सकाळ!

 

भाकरीचं गणितंच वेगळं आहे…

कोण ती कमवायला पळतायत तर…

कोण ती पचवायला!

 

तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,

जी तुमच्या आवाजावरून तुमच्या

सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..

शुभ सकाळ !

 

हसता-खेळता घालवुया दिवसाचा,

प्रत्येक क्षण..

भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया,

प्रसन्न मन..

शुभ सकाळ!

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,

नाजूक उन्हाची प्रेमळ साद,

मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,

रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ…

शुभ सकाळ!

 

स्वतासाठी सुंदर घर करणे हे

प्रत्येकाचे एक स्वप्न असते,

पण.. एखाद्याच्या मनात घर करणे,

यापेक्षा सुंदर काहीच नसते…

सुप्रभात!

 

यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर

दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य.

कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही.

तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.

शुभ सकाळ!

 

मदत ही खूप महाग गोष्ट आहे..

याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका..

कारण खूप कमी लोकं

मनाने श्रीमंत असतात..

सुप्रभात!

गुलाब कोठेही ठेवला तरी,

सुगंध हा येणारंच..

आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे,

कोठेही असली तरी,

आठवण ही येणारंच..

शुभ सकाळ!

Whats_app_banner