Good Morning Wishes : राग एकटाच येतो पण...; सकाळची सुरुवात करताना प्रियजनांना पाठवा ‘हे’ खास संदेश
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : राग एकटाच येतो पण...; सकाळची सुरुवात करताना प्रियजनांना पाठवा ‘हे’ खास संदेश

Good Morning Wishes : राग एकटाच येतो पण...; सकाळची सुरुवात करताना प्रियजनांना पाठवा ‘हे’ खास संदेश

Oct 16, 2024 07:36 AM IST

Good Morning in Marathi : दिवसाची सुरुवात नेहमी चांगल्या मूडने आणि प्रसन्न चेहऱ्याने केली पाहिजे. पण त्यासाठी करणार काय? असा प्रश्न सर्वांना पडतो.

Good Morning Wishes In Marathi:
Good Morning Wishes In Marathi: (pexel)

Good Morning in Marathi : दिवसाची सुरुवात नेहमी चांगल्या मूडने आणि प्रसन्न चेहऱ्याने केली पाहिजे. पण त्यासाठी करणार काय? असा प्रश्न सर्वांना पडतो. त्यासाठी तुम्ही उठल्यावर पहिले काही मजेशीर मेसेज प्रियजनांना पाठवू शकतात. हे मेसेज पाठवून तुम्ही दिवसाची चांगली सुरुवात करु शकता. जर तुम्हाला असे काही मजेशीर मेसेज हवे असतील, जे आपला दिवस मजेदार बनवू शकतात. तर ते इथे वाचा...

 

यशाची उंची गाठताना

कामाची लाज बाळगू नका,

आणि कष्टाला घाबरू नका,

नशीब हे लिफ्टसारखं असतं,

तर कष्ट म्हणजे जिना आहे,

लिफ्ट कधीही बंद पडू शकते,

पण जिना मात्र तुम्हाला नेहमी,

वरच घेऊन जात असतो.

शुभ सकाळ

 

 

यशस्वी व्हायचं असेल तर,

सुरुवात एकट्यानेच करावी लागते,

जेव्हा तुम्ही जिंकू लागता;

तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात…

शुभ सकाळ!

 

 

यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर

दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य

कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही,

तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.

 

 

लाखो क्षण अपूर्ण पडतात,

आयुष्याला दिशा देण्यासाठी

आपली एक चूक कारणीभूत ठरते

ते दिशाहीन करण्यासाठी,

किती कष्ट घ्यावे लागतात,

यशाचं शिखर चढण्यासाठी,

क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो,

वरून खाली पडण्यासाठी

शुभ सकाळ

 

 

राग एकटाच येतो,

पण जाताना आपल्यातली

सर्व चांगली लक्षण घेऊन जातो,

संयमसुध्दा एकटाच येतो,

पण येताना आपल्यासाठी कायमची

चांगली लक्षण घेऊन येतो.

फक्त निवड कोणाची करायची

हे आपणंच ठरवायचे आहे.

शुभ सकाळ!

 

 

राग आल्यावर थोडं थांबलं

आणि चूक झाल्यावर थोडं नमलं

तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात.

शुभ सकाळ

 

शोधणार आहात तर

काळजी करणारे शोधा कारण

गरजेपुरता वापरणारे

स्वतःच तुम्हाला शोधत येतात.

शुभ सकाळ!

 

 

आपण ज्याची इच्छा करतो,

प्रत्येकवेळी तेच आपल्याला

मिळेल असे नाही…

परंतु नकळत बऱ्याच वेळा

आपल्याला असे काहीतरी मिळते,

ज्याची कधीच अपेक्षा नसते…

यालाच आपण,

केलेल्या चांगल्या कामाबद्दल

मिळालेले आशीर्वाद असे म्हणतो!

 

 

मंदिरातील घंटेला आवाज नाही,

जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही,

कवितेला चाल नाही,

जोपर्यंत तुम्ही ती गात नाही,

त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही,

जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही!

शुभ सकाळ!

Whats_app_banner