Good Morning Wishes: 'जिव्हाळायाचे ऋणानुबंध असल्याशिवाय..', 'या' खास संदेशाने प्रियजनांना म्हणा शुभ सकाळ-good morning in marathi send a special morning message to someone special ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: 'जिव्हाळायाचे ऋणानुबंध असल्याशिवाय..', 'या' खास संदेशाने प्रियजनांना म्हणा शुभ सकाळ

Good Morning Wishes: 'जिव्हाळायाचे ऋणानुबंध असल्याशिवाय..', 'या' खास संदेशाने प्रियजनांना म्हणा शुभ सकाळ

Aug 25, 2024 08:25 AM IST

Marathi Good Morning Wishes: गुड मॉर्निंगची सुरुवात जर चांगल्या विचारांनी होत असेल, तर आणखी काय हवे. शिवाय तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींनासुद्धा हीच सकारात्मक ऊर्जा देऊ शकता.

Good Morning Wishes In Marathi:
Good Morning Wishes In Marathi: (pexel)

Good Morning Wishes In Marathi: दिवसाची सुरुवात नेहमी उत्साहाने आणि नवीन उर्जेने करावी. प्रत्येक दिवस स्वतःमध्ये एक नवीन अनुभव आणि ऊर्जा घेऊन येतो. यामध्ये नवीन सकारात्मक गोष्टी असण्याची शक्यता असते. चांगली सुरुवात आपल्याला नव्या उंचीवर नेऊ शकते. गुड मॉर्निंगची सुरुवात जर चांगल्या विचारांनी होत असेल, तर आणखी काय हवे. शिवाय तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींनासुद्धा हीच सकारात्मक ऊर्जा देऊ शकता. त्यासाठी त्यांना फक्त एका मेसेजसोबत गुड मॉर्निंग म्हणण्याची गरज आहे. तुमच्या एका मेसेजने एखाद्याचा दिवस चांगला होऊ शकतो. तुम्ही सोशल मीडियावर शुभ सकाळचे हे मेसेज तुमच्या मित्रांना शेअर करू शकता.

मराठी गुड मॉर्निंग संदेश-

धावपळीच्या या जीवनात कोण

कोणाची आठवण काढत नाही

पण मला मात्र आपल्याला रोज

शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.

!! शुभ सकाळ !!

 

जिव्हाळायाचे ऋणानुबंध

असल्याशिवाय कोणी कोणाच्या

आयुष्यात येत नाही.

सुप्रभात!

 

आपण जे देतो ते आपल्याकडे

परत येतं त्यामुळे चांगलं द्या,

चांगलच मिळेल.

शुभ सकाळ!

 

सोन्याचा साठा करुन मिळालेल्या

श्रीमंतीपेक्ष्या तुमच्या सारखा सोन्याहून

मुल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे ते खरे श्रीमंत…

शुभ सकाळ!

 

आवडतं मला त्या लोकांना

सकाळी गुड मॉर्निंग पाठवायला

जे माझ्या समोर नसून सुध्दा

माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे.

सुप्रभात!

 

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात

पण चालणारे आपण एकटेच असतो,

पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,

पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.

शुभ सकाळ!

छापलेली पुस्तके वाचल्याने

खरे ज्ञान मिळत नाही.

अनुभवाचे पुस्तक वाचल्याने

खरे ज्ञान मिळते, कारण

छापलेल्या पुस्तकांचे लेखक

अनेक असतात पण

अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक

आपण स्वत: असतो.

गुड मॉर्निंग!

 

नारळ आणि माणूस

दर्शनी कितीही चांगले

असले तरीही नारळ

फोडल्या शिवाय आणि

माणूस जोडल्याशिवाय

कळत नाही.

शुभ सकाळ!

 

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,

फारसे मनावर घेऊ नये कारण,

या जगात असा कोणीच नाही,

ज्याला सगळे चांगले म्हणतील.

शुभ सकाळ!

 

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,

मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,

आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,

ती पण तुमच्या सारखी !

शुभ सकाळ!

 

 

विभाग