Good Morning Marathi Message: सकाळी उठल्याबरोरबर आपण मोबाईल पाहतो. अशात जर आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीचा मेसेज आला, आणि त्यांच्याकडून सकाळच्या शुभेच्छा मिळाल्या तर आपला दिवस चांगला जातो. त्यामुळेच सकाळी उठल्याबरोबर एखाद्याला शुभ सकाळ देणे महत्वाचे असते. आपल्या एका मेसेजने एखाद्याचा संपूर्ण दिवस सकारत्मक बनतो. अलीकडे अनेक लोक व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा विविध सोशल मीडियावर मेसेज पाठवून सकाळच्या सुंदर शुभेच्छा देत असतात. शिवाय यासाठी तुम्ही सुंदर सुंदर मेसेजही शोधत असता. आज आम्ही तुमच्यासाठी असेच एकापेक्षा एक तब्बल १० सुंदर मेसेज घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहूया हे मेसेज...
थंडी क्षणाची, गारवा कायमचा
ओळख क्षणाची, पण आपुलकी कायमची
भेट क्षणाची पण नाती आयुष्यभरची
सहवास क्षणाची, पण ओढ कायमची
हीच खरी नाती माणूसकीची…
चुक ही आयुष्याच पान आहे,
माफी ही त्या आयुष्याचं पुस्तक आहे,
गरच पडली तर चुकीच पान फाडुन टाका,
पण एका पानासाठी संपूर्ण पुस्तम गमावू नका…
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
शुभ सकाळ
आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही.
शुभ सकाळ
हसता-खेळता घालवुया
दिवसाचा प्रत्येक क्षण
भगवंताच्या नामस्मरणाने
ठेवुया प्रसन्न मन
आनंदाने फुलवुया
जीवनाचा सुंदर मळा
सद्विचारांच्या रंगाने
रंगवुया मनाचा फळा
सुर्योदयाच्या साक्षीने देऊ
सर्वांना शुभेच्छा
सुख-समाधान-शांती लाभो
हीच ईश्वर चरणी इच्छा.
तोंडी साखरेचा, गोडवा कायम असावा
मनात कुणाच्या, कधी राग नसावा
आयुष्यात जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून जावे व्यवहारी, फायदे तोटे
सुख क्षणांचे मणी, हळुवार प्रेमाने ओवावे,
आनंदी सुरांनी, मनास छेडावे.
शुभ सकाळ
आयुष्यात निर्मळ मनाने बनवलेली नाती
कधीच धोका देत नाही
म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा रहा
नाती कधीच तुटत नाही.
शुभ सकाळ
मंदिरातील घंटेला आवाज नाही
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही
कवितेला चाल नाही
जोपर्यंत तुम्ही ती गात नाही
त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही
शुभ सकाळ
मन वळु नये,अशी श्रध्दा हवी
निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी
सामर्थ्य संपू नये,अशी शक्ती हवी
कधी विसरु नये,अशी नाती हवी
शुभ सकाळ
देवाकडे काही मागायचे
असेल तर नेहमी आईचे स्वप्न
पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा,
तुम्हाला कधी स्वत:साठी
काही मागायची गरज पडणार नाही.
सुप्रभात
संबंधित बातम्या