कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक पद्धती सांगितल्या आहेत. अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रात अनेक रत्नांचा उल्लेख आहे, जे धारण केल्याने ग्रह दोष दूर होतात. हे ग्रह दोष लवकरात लवकर दूर करणे उत्तम, अन्यथा प्रगती थांबू शकते, म्हणून स्फटिक धारण केल्याने कोणते नुकसान टाळता येईल आणि तुमच्या भावी जीवनात तुम्हाला कोणते फायदे होतील ते जाणून घ्या.
संपत्ती किंवा आर्थिक संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी देवी लक्ष्मीची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. रत्न शास्त्रानुसार स्फटिक रत्न धारण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि खूप शुभ फल देते. असे म्हटले जाते की, हे विशेष रत्न आर्थिक अडचणी दूर करते. स्फटिक हे एक रंगहीन आणि पारदर्शक दगड आहे. देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी आपल्या आर्थीक अडचणी दूर व्हाव्या याकरीता हे रत्न धारण करावे.
मन शांत होण्यासाठी, चिडचिड कमी होण्यासाठी हे रत्न चांगले काम करते. निर्णय घेताना मन स्थिर करतं. लहान मुले सतत रडत असतील, चिडचिड करत असतील तर त्यांच्यासाठी हे उत्तम रत्न आहे. शरीरातील नकारात्मकता कमी करून चांगलं आरोग्य देण्याचं काम हे रत्न करतं.
रत्न शास्त्रानुसार स्फटिकाचा हार धारण केल्याने व्यक्तीला आर्थिक यश मिळते. त्याच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसते. असे लोक सुख-सुविधांनी भरलेले जीवन जगतात. असे मानले जाते की हे रत्न कौटुंबिक कलहातूनही आराम देते. हे रत्न धारण केल्याने मानसिक त्रास दूर होतो. तिजोरीत स्फटीकाची जपमाळ ठेवल्याने संपत्ती वाढते असे म्हटले जाते. तिजोरी दक्षिण दिशेला ठेवल्याने उत्पन्न वाढते.
शुक्रवारी किंवा बुधवारी घाला - ज्योतिषांच्या मते बुधवार किंवा शुक्रवारी स्फटिक धारण केल्याने व्यक्तीचे प्रलंबित काम पूर्ण होण्यास मदत होते. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. असे म्हटले जाते की, स्फटीक रत्न धारण केल्याने आर्थिक समस्या कमी होतात. नेकलेस आणि अंगठ्यामध्ये क्रिस्टल्स घालता येतात.
स्फटिक कसे घालावे- स्फटिक रत्न धारण करण्यापूर्वी गंगाजलाने शुद्ध करा. नंतर देवी लक्ष्मीसमोर ठेवा. यानंतर "ॐ श्री लक्ष्मीये नमः" या मंत्राचा किमान ७ वेळा जप करा. यानंतर ते परिधान करा. हे रत्न धारण करण्याआधी योग्य सल्ला घ्यावा.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या