Geeta Updesh: श्रीमन भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे. जे त्यांनी महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला दिले होते. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे. गीतेमधील हे उपदेश माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. गीतेत 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत ज्यात धर्माच्या मार्गावर चालत चांगले कर्म करण्याची शिकवण देण्यात आली आहे.
-वैदिक शास्त्रानुसार, आयुष्यातील सर्व अडचणी आणि समस्यांचे समाधान गीतेत सापडते. असे मानले जाते की, गीतेमधील उपदेशांचे पालन केल्याने जीवन बदलते. शिवाय माणसाला प्रत्येक कामात यश मिळते. आज आपण श्रीमद भागवत गीतेमधील श्रीकृष्णाच्या अशाच काही उपदेशांबाबत जाणून घेणार आहोत.
-जेव्हा तुमचे मन अस्वस्थ असते. तेव्हा दीर्घ श्वास घ्या आणि तुमच्या सर्व अडचणी आणि समस्या भगवंताच्या चरणी अर्पण करा. कारण जीवनातील सर्व संकटे भगवंताच्या चरणी येऊन समाप्त होतात.
-श्रीकृष्णाच्या मते, आपले मनच आपल्या दुःखाचे महत्वाचे कारण असते. ज्या व्यक्तीला आपल्या मनावर आवर घालता येतो, तोच व्यक्ती विनाकारण निर्माण होणाऱ्या अपेक्षा आणि दुःखातून मुक्ती मिळवू शकतो. मनावर ताबा ठेवणारी व्यक्तीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकते.
-गीतेमधील उपदेशानुसार, आयुष्यात कोणताही निर्णय कधीही रागाच्या भरात घेऊ नये. कारण रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे असतात. बहुतांश व्यक्तीला या निर्णयांचा नंतर खूप पश्चाताप होतो. त्यामुळे राग आला तरी शांत राहण्याचा प्रयत्न करावा.
-कुतूहल असलेल्या व्यक्तीलाच शिक्षण आणि ज्ञान प्राप्त होते. असे गीतेत म्हटले जाते. कोणत्याही व्यक्तीला आदराने प्रश्न विचारून ज्ञान मिळवता येते. एखादी व्यक्ती जेव्हा त्याचे कुतूहल व्यक्त करते, तेव्हाच ज्ञान प्राप्त होते. धर्मग्रंथात लिहिले आहे, गुरुची शिकवण आणि अनुभव यांचा योग्य मिलाफ करून ज्ञान प्राप्त होते.
-भागवत गीतेमध्ये श्रीकृष्णाने उपदेश करत सांगितले आहे की, माणसाने परिणामांची चिंता सोडून कर्मावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. कारण मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते. त्यामुळे आपण आपले कर्म चांगले ठेवावे. आणि म्हणूनच कर्म चांगले केल्यास परिणामदेखील चांगलेच प्राप्त होणार.
-गीतेच्या म्हणण्यानुसार, कठीण प्रसंगी जेव्हा तुमच्या मनातून ‘सगळं काही ठीक होईल’ असा हळुवार आवाज येतो. तेव्हा तो आवाज ईश्वराचा असतो. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आला तरी धीर धरा कारण यावेळी देव तुमच्या पाठीशी आहे.
संबंधित बातम्या