Geeta Updesh: आजच्या काळात मुलांना मोबाईलचे व्यसन लागले आहे. मुले दिवसातील कित्येक तास मोबाईलमध्ये वाया घालवतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. तसेच त्यांच्यात नैतिक मूल्यांचा अभाव दिसून येत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना गीतेचे हे उपदेश शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. या उपदेशांमुळे मुलांना जीवनाचा खरा अर्थ समजेल. शिवाय आयुष्यातील प्रत्येक टप्यावर यश प्राप्त होईल.
श्रीमन भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे. भागवत गीता हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ मानला जातो.हा ग्रंथ महाभारत युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. महाभारताच्या युद्धावेळी रणांगणावर जेंव्हा अर्जुनाची पावले डगमगली होती तेंव्हा, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काही उपदेश दिले होते. त्यालाच गीता उपदेश असे संबोधले जाते. दरम्यान गीतेमध्ये एकूण १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत. ज्यामध्ये धर्माच्या मार्गावर चालत कार्य करण्याचे उपदेश दिले आहे.
- गीतेमधील उपदेशात सांगण्यात आले आहे की, फक्त तुमच्या कृतींवर तुमचा अधिकार आहे. तुमच्या कृतींच्या फळांवर नाही. म्हणून, परिणामांच्या अपेक्षेसाठी कोणतीही कृती करू नका.
- एखाद्या गोष्टीचा सतत विचार केल्याने माणूस त्या गोष्टीशी संलग्न होतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये भावना निर्माण होतात. ती वस्तू न मिळाल्याने त्या भावनेचे रूपांतर क्रोधात होते. त्यामुळे माणसाने कोणत्याही गोष्टीच्या मोह करू नये.
- माणसाने रागावर नियंत्रण ठेवावे. राग हा मानवी बुद्धीचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागामध्ये माणूस स्वतःचा विनाश करतो. बहुतांश मुलांना प्रचंड राग येतो. अशा परिस्थितीत हा उपदेश त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.
- भागवत गीतेनुसार, कोणत्याही व्यक्तीला कुणीही स्वतःहून चांगले ओळखू शकत नाही. म्हणून स्वतःचे मूल्यांकन करणे खूप महत्वाचे आहे. जे काम दुसरे कुणी करतात ते आपण करू शकत नाही असे आपल्याला नेहमी वाटत असते. गीतेनुसार, कोणतीही व्यक्ती ज्याला स्वतःचे गुण आणि उणिवा माहिती असतात. त्या व्यक्तीला स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवून प्रत्येक कामात यश मिळवता येते.