Geeta Updesh In Marathi: श्रीमन भागवत गीता हे आयुष्य म्हणजे काय हे सांगणाऱ्या उपदेशांचे सार आहे असे म्हटले जाते. हिंदू धर्मातील सर्वात पवित्र धर्म ग्रंथांपैकी एक अशी या ग्रंथांची ओळख आहे. आहे. भागवत गीतेमध्ये दिलेली शिकवण आपल्याला जीवन योग्य पद्धतीने जगायला शिकवते. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर गीतेचे हे ५ उपदेश अवश्य लक्षात ठेवा. या शिकवणी तुम्हाला केवळ करिअरमध्येच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातही यशस्वी होण्यास मदत करतील. तसेच प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीचा ताण टाळण्यास आणि नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करेल.
एखाद्या गोष्टीवर जास्त जीव लावणे
आपण एखाद्या गोष्टीशी, एखाद्या व्यक्तीशी किंवा यश मिळविण्यासाठी खूप संलग्न असतो. गीतेमधील उपदेशानुसार, एखाद्या गोष्टीशी अधिक लगाव तुमच्यासाठी चांगले नसते. हे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सल्ला दिला होता की, जास्त आसक्ती माणसामध्ये क्रोध आणि निराशा निर्माण करू शकते. कारण जेव्हा माणसाला ती गोष्ट मिळत नाही तेव्हा त्याला राग आणि निराशा वाटते. त्यामुळे सर्व कामे विस्कळीत होतात.
धाडसी व्हा
भागवत गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाचा सार सांगताना नेहमी निर्भयपणे काम करावे असा उपदेश केला आहे. जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या ध्येयापासून विचलित व्हाल. आणि ते काम पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे जीवनातील समस्यांना न घाबरता सामोरे जावे. जेणेकरून तुमच्यासाठी यशाची दारे उघडतील. धाडसाने सर्व गोष्टींना तोंड दिल्यास यश निश्चित तुमच्या पदरात पडते.
संशयीवृत्ती टाळा
बहुतांश लोकांना स्वतःवर विश्वास नसतो. मी हे काम करू शकेन का? असा प्रश्न त्यांना नेहमी पडतो. गीतेमध्ये श्रीकृष्ण स्वतःच्या कृतीवर संशय न घेण्याचा उपदेश करतात. कोणतेही काम करताना ते आत्मविश्वासाने करा. त्यामुळे कामात यश मिळण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही ज्यावेळी स्वतःवर संशय घेता तेव्हा तुम्ही आपल्या कार्यात पूर्णपणे एकाग्रता दाखवू शकत नाही अशाने तुम्हाला अपयश मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणतेही कार्य करताना स्वतःवर संशय न घेता पूर्ण विश्वासाने वाटचाल करा.
रागावर नियंत्रण ठेवा
भागवत गीतेमध्ये श्रीकृष्णाने दिलेल्या उपदेशानुसार, रागामुळे सर्व काम बिघडते. रागामुळे केवळ कामच नाही तर नातेसंबंधही बिघडतात. म्हणून स्वत:ला शांत आणि एकजूट ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही शांत राहून कार्य केल्याने काम जास्त उत्तमप्रकारे होते. शिवाय तुम्हाला यश मिळण्यासही मदत होते.
कृती करण्यापूर्वी परिणामांचा विचार करू नये
कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या परिणामाचा विचार केला तर ते काम बरोबर होणार नाही. त्यामुळे आधी पूर्ण मेहनत घेऊन काम पूर्ण करा. त्याच्या परिणामांचा विचार करू नका. यामुळे यशाची शक्यता वाढते.
संबंधित बातम्या