Geeta Updesh : 'योग्य वेळेच्या प्रतीक्षेत आलेली संधी गमवाल...' श्रीकृष्णाचे हे उपदेश आयुष्य करतील सोपे
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : 'योग्य वेळेच्या प्रतीक्षेत आलेली संधी गमवाल...' श्रीकृष्णाचे हे उपदेश आयुष्य करतील सोपे

Geeta Updesh : 'योग्य वेळेच्या प्रतीक्षेत आलेली संधी गमवाल...' श्रीकृष्णाचे हे उपदेश आयुष्य करतील सोपे

Jul 15, 2024 05:00 AM IST

Geeta Updesh In Marathi : हिंदू धर्मातील या पवित्र धर्मग्रंथानुसार मनुष्याला त्याच्या आयुष्यातील सर्व समस्यांचे समाधान श्रीमद भागवत गीतेमध्ये सहजपणे मिळू शकते.

गीता उपदेश
गीता उपदेश

श्रीमद भागवत गीता हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ मानला जातो. भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन करण्यात आले आहे. ही शिकवण त्यांनी महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनला दिली होती. या पवित्र गीतेमध्ये एकूण १८ अध्याय आणि तब्बल ७०० श्लोक समाविष्ट करण्यात आले आहेत. श्रीकृष्णाने यामध्ये धर्माच्या मार्गावर चालण्याचा आणि चांगले कर्म करण्याचा उपदेश केला आहे. विशेष म्हणजे श्रीकृष्णाची ही शिकवण आज एकविसाव्या शतकातदेखील उपयोगी पडते. आजही बहुतांश लोक याच मार्गावर चालत आपली ध्येय पूर्ण करतात.

हिंदू धर्मातील या पवित्र धर्मग्रंथानुसार मनुष्याला त्याच्या आयुष्यातील सर्व समस्यांचे समाधान भगवद्गीतेमध्ये सहजपणे मिळू शकते. शिवाय असे मानले जाते की, गीतेत दिलेल्या मूल्यांचे पालन केल्याने आयुष्यच बदलते आणि व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते. यासोबतच गीतेमध्ये काही यशाचे मूलमंत्र देखील सांगण्यात आले आहेत, जे तुम्ही तुमच्या आयुष्यात लागू करू शकता. श्रीकृष्ण गीतेमध्ये चांगले कर्म करण्याच्या आणि आयुष्यात पुढे चालत राहण्याची प्रेरणा देतात. आजही लोक आपल्या आयुष्यात यश, सुख समाधान प्राप्त करण्यासाठी या उपदेशाचा अवलंब आपल्या आयुष्यात आवर्जून करतात. पाहूया गीतेमधील काही महत्वाचे उपदेश.

कोणतेही कार्य टाळू नये

श्रीकृष्णांनी गीतेमध्ये दिलेल्या उपदेशानुसार, कोणतेही कार्य टाळणे बंद करावे. कारण प्रत्येक कार्य त्या-त्या निश्चित वेळेत होणे आवश्यक असते. ते ते कार्य त्या त्या ठराविक वेळेत पूर्ण झाल्यास, व्यक्तीला यश अवश्य मिळते. त्यामुळेच वेळचे महत्व जाणून प्रत्येक कार्य योग्य वेळेत करावे. ही कामे जर तुम्ही सतत टाळत राहिला तर योग्य वेळ निघून जाते आणि तुमच्या पदरात अपयश पडते. त्यामुळे हा उपदेश तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.

आपली क्षमता ओळखा

भगवान श्रीकृष्णांच्या मते, प्रत्येक व्यक्तीला आपल्यात लपलेली क्षमता ओळखता यायला हवी. त्यासाठी त्याने स्वतःचे परीक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही जर आपल्या इच्छेविरुद्ध आणि क्षमतेविरुद्ध जाऊन कामाची निवड केली, तर तुम्हाला त्यामध्ये हवे तसे यश लाभत नाही. याउलट जर तुम्ही आपल्या क्षमतेनुसार कामाची निवड केली तर तुम्ही त्यामध्ये आपसूकच यशस्वी होता. कारण त्याच कार्यसाठी तुमचा जन्म झालेला असतो. त्यामुळे आपण कोणतेही कार्य करण्यापूर्वी स्वतःची क्षमता आणि आवड ओळखून निवडणे योग्य असते.

आपली दृष्टी स्वच्छ ठेवणे

भगवान श्रीकृष्णांनी दिलेल्या उपदेशानुसार, आपल्याला आपली दृष्टी नेहमीच स्वच्छ ठेवायला हवी. कारण आपल्या नजरेत शंका आणि संशय, लोभ असेल तर ती व्यक्ती कधीच आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. अशा व्यक्तीला यश आणि मानसिक समाधान लाभणे अत्यंत कठीण असते. याउलट आपण खात्री करुन, विश्वास ठेऊन आपली दृष्टी सुधारली तर आपल्या यशाचा मार्ग मोकळा होतो. शिवाय आपल्या नजरेतून द्वेष, मत्सर या भावना दूर ठेवल्याने आपल्याला सुखसमृद्धी आणि आनंद प्राप्त होतो.

Whats_app_banner