Geeta Updesh: गीतेमधील उपदेशाने कळेल जीवनाचा खरा अर्थ! वाचा भगवान श्रीकृष्ण नेमकं काय सांगतात-geeta updesh lord krishna has told the real meaning of life in the geeta ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: गीतेमधील उपदेशाने कळेल जीवनाचा खरा अर्थ! वाचा भगवान श्रीकृष्ण नेमकं काय सांगतात

Geeta Updesh: गीतेमधील उपदेशाने कळेल जीवनाचा खरा अर्थ! वाचा भगवान श्रीकृष्ण नेमकं काय सांगतात

Aug 04, 2024 07:24 AM IST

Geeta Updesh: आजही लोक श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेल्या मार्गांचाच अवलंब करतात. कारण त्यामध्ये जीवनाचा सार सांगण्यात आला आहे.

Geeta Updesh: गीता उपदेश
Geeta Updesh: गीता उपदेश

Geeta Updesh: भगवान श्रीकृष्णा संबंधित अनेक कथा आणि मान्यता आहेत. यामध्ये भागवत गीतेचे ज्ञान सर्वात महत्वपूर्ण समजले जाते. जगातील प्रत्येक गोष्टीची उत्तरे गीतेत सापडतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या चांगल्या आणि वाईट काळात गीतेचे वाचन केले पाहिजे. फक्त वाचन करून चालणार नाही, तर त्या मार्गावर चालले पाहिजे. वास्तविक पाहायला गेल्यास आजही लोक श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेल्या मार्गांचाच अवलंब करतात. कारण त्यामध्ये जीवनाचा सार सांगण्यात आला आहे.

ज्यांना माहित नाही त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान तेव्हा दिले होते जेव्हा, त्याने सर्व शस्त्रांचा त्याग करून पराभव स्वीकारला होता. तसेच त्याने आपल्या भाऊ आणि नातेवाईकांशी लढायचे नाही असे ठरवले होते. याच काळात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याचे दिव्य रूप दाखवत आणि त्याला काही महत्वाचे उपदेश केले होते. याच उपदेशांचा उल्लेख श्रीमन भागवत गीतेत करण्यात आला आहे.

 

१) ''यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।

अभ्युत्थानमधर्मस्य तदाऽऽत्मानं सृजाम्यहम्।।''

या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगतात की, 'जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते, जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो, तेव्हा मी पृथ्वीवरून वाईट शक्तींना दूर करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी पुन्हा पुन्हा येईन. प्रत्येक युगातील अधर्मापासून धर्माचे रक्षण करणे आणि लोकांचे रक्षण आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी पृथ्वीवर अवतरत राहीन.

 

२) ''कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ''...!!

आपल्याला आपले कर्तव्य बजावण्याचा अधिकार आहे. परंतु परिणाम केवळ आमच्या प्रयत्नांवर अवलंबून नाहीत. परिणाम ठरवण्यात अनेक घटक भूमिका बजावतात जसे की आपले प्रयत्न, नशीब, देवाची इच्छा, इतरांचे प्रयत्न, सहभागी लोकांचे एकत्रित कर्म, स्थान आणि परिस्थिती इत्यादी. त्यामुळे आपण फक्त प्रयत्न करण्यावर लक्ष केंद्रित करावे. या श्लोकात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला समजावून सांगितले आहे की, 'त्याने परिणामांची चिंता करणे सोडून फक्त चांगले काम करण्यावर लक्ष केंद्रित करावे. सत्य हे आहे की जेव्हा आपण परिणामांबद्दल काळजी करत नाही, तेव्हा आपण आपल्या प्रयत्नांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकतो आणि त्यामुळेच त्यामुळेच परिणाम पूर्वीपेक्षा चांगले मिळतात.

३) ''रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः।

प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु!!''

या श्लोकात श्रीकृष्णाने अर्जुनला सांगितले आहे की 'मी सर्व उर्जेच्या स्त्रोतांमध्ये उपस्थित आहे. हे कुंतीपुत्र, सूर्य आणि चंद्र माझ्यापासूनच त्यांचे तेज प्राप्त करतात. मी वैदिक मंत्रांमधील पवित्र अक्षर ओम आहे. मी आकाशातील आवाज आहे. मानवामध्ये प्रकट झालेल्या सर्व क्षमतांसाठीही मीच उर्जा स्त्रोत आहे.

विभाग