Geeta Updesh: गीतेमधील 'या' गोष्टी आयुष्य बनवतील सोपे! एकदा वाचल्यास कधीच येणार नाही अपयश-geeta updesh life will be easy if you practice these things in geeta ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: गीतेमधील 'या' गोष्टी आयुष्य बनवतील सोपे! एकदा वाचल्यास कधीच येणार नाही अपयश

Geeta Updesh: गीतेमधील 'या' गोष्टी आयुष्य बनवतील सोपे! एकदा वाचल्यास कधीच येणार नाही अपयश

Aug 05, 2024 07:04 AM IST

Geeta Updesh: गीतेमध्ये एकूण १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत. ज्यामध्ये धर्माच्या मार्गावर चालत कार्य करण्याचे उपदेश दिले आहे. धर्मग्रंथानुसार मनुष्याला त्याच्या सर्व समस्यांचे समाधान भगवद्गीतेमध्ये मिळू शकते.

Geeta Updesh: गीतेमधील 'या' गोष्टी आयुष्य बनवतील सोपे!
Geeta Updesh: गीतेमधील 'या' गोष्टी आयुष्य बनवतील सोपे!

Geeta Updesh:  भागवत गीता हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ मानला जातो. श्रीमन भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे. जे त्यांनी महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला दिले होते. गीतेमध्ये एकूण १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत. ज्यामध्ये धर्माच्या मार्गावर चालत कार्य करण्याचे उपदेश दिले आहे. धर्मग्रंथानुसार मनुष्याला त्याच्या सर्व समस्यांचे समाधान भगवद्गीतेमध्ये मिळू शकते. असे मानले जाते की, गीतेच्या शिकवणीचे पालन केल्याने जीवन बदलते आणि व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते. यासोबतच गीतामध्ये काही यशाचे कानमंत्र देखील सांगण्यात आले आहेत. जे, तुम्ही जीवनात लागू करू शकता. गीता काम करण्याची आणि आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देते. अशा परिस्थितीत आपण गीतेच्या त्या महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया ज्या प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनात आचरणात आणणे गरजेचे आहे.

अशा लोकांनाच मिळते यश-

भगवान श्रीकृष्ण भागवत गीतेमध्ये म्हणतात की, प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कामात निपुण आहे. किंवा सर्व काम योग्य पद्धतीने करू शकतो हे आवश्यक नाही, त्यामुळे तुमची ताकद ओळखा आणि ज्या कामात तुम्ही चांगले आहात तेच करण्याचा प्रयत्न करा. यामध्येच तुमचे यश निश्चित आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की, मला तर ते व्हायचं होतं आणि हे झालो. परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही ज्या जीवनासाठी पृथ्वीवर जन्म घेतलात तेच तुम्ही करू शकता.

कोणतेही कार्य टाळू नये-

श्रीमद भागवत गीतेनुसार, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, कोणतेही काम कधीही पुढे ढकलू नये. तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण केले पाहिजे, जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर त्याला नेहमीच यश मिळते. त्याच वेळी, जर तुम्ही नेहमी तुमच्या कर्मापासून दूर पळत राहिल्यास, तुम्ही जीवनात यश मिळवू शकणार नाही. गीतेमध्ये असे म्हटले आहे की, जर एखाद्या व्यक्तीची कृती योग्य दिशेने असेल तर तो मोठ्या संकटांना देखील सहजपणे तोंड देऊ शकतो आणि त्याला कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही.

स्वतःवर ताबा महत्वाचा-

भीती वाटणे हे काही गैर नाही. परंतु त्या भीतीला कधीही आपल्यावर वर्चस्व मिळवू देऊ नका. स्वतःवर नियंत्रण ठेवूनच यश मिळवणे शक्य आहे. माणसाचे मन जोपर्यंत त्याच्या नियंत्रणात असते तोपर्यंतच तो त्याचा मित्र असतो. जेव्हा तुमचे मन तुमच्या नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा तो तुमचा सर्वात मोठा शत्रू बनतो. म्हणूनच जोपर्यंत तुम्ही बरोबर आहात आणि आयुष्यात कोणतीही चूक करत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणालाही घाबरू नका.

आत्मपरीक्षण गरजेचे-

भागवत गीतेनुसार, कोणत्याही व्यक्तीला कुणीही स्वतःहून चांगले ओळखू शकत नाही. म्हणून स्वतःचे मूल्यांकन करणे खूप महत्वाचे आहे. जे काम दुसरे कुणी करतात ते आपण करू शकत नाही असे आपल्याला नेहमी वाटत असते. गीतेनुसार, कोणतीही व्यक्ती ज्याला स्वतःचे गुण आणि उणिवा माहिती असतात. त्या व्यक्तीला स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवून प्रत्येक कामात यश मिळवता येते.

विभाग