Geeta Updesh In Marathi : भगवद्गीता हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ मानला जातो. श्रीमद्भागवत गीतेमध्ये भगवान कृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे जे त्यांनी महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनला दिले होते. गीतेमध्ये १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत, ज्यामध्ये धर्माच्या मार्गावर चालत कर्म करण्याचे शिक्षण दिले आहे. धर्मग्रंथानुसार मनुष्याला त्याच्या सर्व समस्यांचे समाधान भगवद्गीतेमध्ये मिळू शकते. असे मानले जाते की गीतेच्या शिकवणीचे पालन केल्याने जीवन बदलते आणि व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला अशा अनेक शिकवणी दिल्या आहेत, ज्या आजही लोकांसाठी उपयुक्त आहेत. आजच्या काळात नाती नीट जपणे हेही एक आव्हान आहे. अशा परिस्थितीत तुम्ही गीतेच्या 'या' शिकवणींची मदत घेऊ शकता.
श्रीकृष्ण अर्जुनला सांगतात की, प्रत्येक नात्यात धर्म आणि कर्तव्य लक्षात ठेवावे. प्रत्येक नात्यातील जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करा. या गोष्टी लक्षात ठेवल्या तर नात्यात कधीच गोंधळ निर्माण होणार नाही.
गीतेच्या शिकवणीत भगवान श्रीकृष्ण सांगतात की, तुम्ही कोणत्याही नात्याचा आनंद आणि सुख तेव्हाच घेऊ शकता, जेव्हा त्या संबंधांमध्ये आसक्ती आणि मोह नसतो. कारण नात्याच्या जडणघडणीत गुरफटलेल्या माणसाला इतर कोणत्याही गोष्टीचा मोकळेपणाने आनंद घेता येत नाही.
प्रत्येक व्यक्तीला आपल्या नात्यात आदर आणि प्रेम मिळावे असे वाटते. पण, जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला समान प्रेम आणि आदर द्याल, तेव्हाच हे साध्य होण्याची आशा असते. नात्यात समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने लहान असो वा मोठी, तुम्ही नेहमी त्याचा आदर करावा आणि सर्वांसोबत प्रेमाने राहावे. हे लक्षात ठेवणारी व्यक्ती कधीच कोणत्याच नात्याच्या गुंत्यात अडकणार नाही.
कोणतेही नाते सुधारण्यासाठी सर्वप्रथम स्वतःला चांगले समजून घेतले पाहिजे. गीतेमध्ये असे म्हटले आहे की, जर तुम्ही स्वतःच्या कमकुवतपणा, शक्ती आणि इच्छा ओळखल्या तरच तुम्ही इतर लोकांशी चांगले संबंध राखण्यात यशस्वी होऊ शकता.
संबंधित बातम्या