Geeta Updesh : चांगला व्यक्ती बनण्यासाठी मनुष्याला करावा लागतो 'या' गोष्टींचा त्याग! वाचा गीतेत काय म्हटलंय...
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : चांगला व्यक्ती बनण्यासाठी मनुष्याला करावा लागतो 'या' गोष्टींचा त्याग! वाचा गीतेत काय म्हटलंय...

Geeta Updesh : चांगला व्यक्ती बनण्यासाठी मनुष्याला करावा लागतो 'या' गोष्टींचा त्याग! वाचा गीतेत काय म्हटलंय...

Dec 21, 2024 07:59 AM IST

Geeta Updesh In Marathi : गीतेतून मानवाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवला आहे. जीवनातील धर्म, कर्म, प्रेम आणि तत्वज्ञान याचे उत्तम मार्गदर्शन गीतेतून मिळते.

गीता उपदेश
गीता उपदेश

Geeta Updesh In Marathi : महाभारताच्या युद्धभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेली श्रीमद भागवत गीतेची शिकवण आजही तितकीच महत्वाची आणि समर्पक आहे. गीतेतून मानवाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवला आहे. जीवनातील धर्म, कर्म, प्रेम आणि तत्वज्ञान याचे उत्तम मार्गदर्शन गीतेतून मिळते. गीतेचे वचन आचरणात आणल्याने व्यक्तीला आत्मिक शांती, जीवनातील यश आणि समाजातील सर्वोच्च स्थान मिळते.

> गीतेत धर्म, कर्म आणि प्रेम यांचे महत्व विशद केले आहे. गीतेचे तत्वज्ञान सांगते की व्यक्तीने आपला अहंकार, गर्व, क्रोध, कठोरता आणि अज्ञानाचा त्याग करावा. श्रीकृष्णाच्या मते, या नकारात्मक गोष्टी राक्षसी लक्षणे असून, त्यांचा त्याग केल्याशिवाय मनुष्य एक उत्तम व्यक्ती बनू शकत नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, स्पष्ट आणि थेट बोलणे महत्वाचे असते. कधी कधी कठोर वाटणारी भाषा खरी आणि प्रामाणिक असते, जी कधीही कोणाची फसवणूक करत नाही.

> गीतेत जीवनातील तीन महत्वाचे मंत्र दिले आहेत. पहिला मंत्र असा की आनंदात कोणालाही वचन देऊ नका. दुसरा, रागात उत्तर देऊ नका. तिसरा, दुःखात कोणताही निर्णय घेऊ नका. हे तीन मंत्र जीवनातील संघर्षांशी योग्यरीत्या कसे सामना करावा, याचे प्रभावी मार्गदर्शन करतात.

> श्रीकृष्णाच्या मते, क्रोध हा माणसाचा शत्रू असला तरी योग्य वेळी तो आवश्यक आहे. चुकीच्या गोष्टींना विरोध न केल्यास चूक करणाऱ्या व्यक्तीला आपली चूक लक्षात येत नाही. अशा वेळी योग्य रितीने क्रोध व्यक्त करणे हीच योग्य प्रतिक्रिया ठरते.

Geeta Updesh : भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या 'या' गोष्टी लक्षात ठेवाल, तर आयुष्य होईल अधिक सोपं!

> गीतेच्या शिकवणीनुसार प्रारब्ध म्हणजे आपल्या भूतकाळातील कर्माचे फळ असते. आपण आज जी कृती करतो, त्यावरच आपले भविष्य ठरते. म्हणूनच, व्यक्तीने नेहमी चांगले विचार ठेवावेत आणि चांगले कार्य करावे. गीतेत असेही म्हटले आहे की चांगले हेतू असतील तर काम आपोआपच घडते, आणि लोक आपल्याकडे सकारात्मकतेने पाहू लागतात.

> श्रीमद भागवत गीता केवळ एक धर्मग्रंथ नसून, ती जीवनाचे पूर्ण तत्वज्ञान आहे. ती माणसाला केवळ चांगला व्यक्तीच नव्हे तर एक आदर्श नागरिक बनवते. गीतेतील शिकवणीने व्यक्ती आत्मसन्मान, संयम, प्रामाणिकता आणि परोपकार शिकतो. जीवनातील छोट्या-छोट्या प्रसंगांतूनही गीता सकारात्मकता आणि धैर्य शिकवते.

> श्रीमद भागवत गीतेचा संदेश आजच्या आधुनिक युगातही अत्यंत उपयोगी आहे. गीतेने दिलेले तत्वज्ञान अंगीकारल्याने व्यक्ती आपल्या जीवनातील समस्यांवर मात करू शकतो आणि जीवन अधिक सुसंवादी बनवू शकतो. या तत्वज्ञानाचा अंगिकार करून समाजातही सुधारणा करता येते. म्हणूनच, गीता प्रत्येकाच्या जीवनात एक प्रेरणास्त्रोत ठरते.

Whats_app_banner