Geeta Updesh : 'ही' १ गोष्ट आहे मनुष्याच्या दुःखाचे कारण! भगवान श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश करताना सांगितलं...
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : 'ही' १ गोष्ट आहे मनुष्याच्या दुःखाचे कारण! भगवान श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश करताना सांगितलं...

Geeta Updesh : 'ही' १ गोष्ट आहे मनुष्याच्या दुःखाचे कारण! भगवान श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश करताना सांगितलं...

Dec 11, 2024 08:15 AM IST

Geeta Updesh In Marathi : भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनला कोणाच्याही मृत्यूवर शोक करू नको, असा सल्ला का दिला होता? चला जाणून घेऊया…

Geeta Updesh : 'ही' १ गोष्ट आहे मनुष्याच्या दुःखाचे कारण!
Geeta Updesh : 'ही' १ गोष्ट आहे मनुष्याच्या दुःखाचे कारण!

Geeta Updesh In Marathi : श्रीमद्भगवद्गीता हे सनातन धर्मातील एक महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. यात एकूण १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत. ज्यामध्ये धर्मयोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग यांचे तपशीलवार वर्णन केले आहे. लोक श्रीमद्भगवद्गीता वाचतात जेणेकरून त्यांना मोक्ष मिळू शकेल. वास्तविक, हे पुस्तक भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादावर आधारित आहे. त्या वेळी माधव म्हणाले होते की, माणसाने आपल्या कर्माची चिंता न करता सतत प्रयत्न करत राहावे. ही लढाई दोन घराण्यातील धर्म आणि अधर्म यांच्यात झाली. त्या काळात अर्जुन खूप कोंडीत सापडला होता. म्हणून, भगवान श्रीकृष्णाने वैश्विक रूप प्रकट केले आणि अर्जुनला विजयासाठी मार्गदर्शन केले. 

यावेळी त्यांनी कुरुक्षेत्राच्या रणांगणात बहुमोल प्रवचन दिले होते. ज्याचे पालन करून पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला. तर, आजच्या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनला कोणाच्याही मृत्यूवर शोक व्यक्त करू नकोस, असा सल्ला का दिला होता. चला सविस्तर जाणून घेऊया…

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च।

तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि।।

या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, जो जन्म घेतो, त्याचा मृत्यू निश्चित असतो आणि ज्याचा मृत्यू झालाय, त्याचा जन्मही निश्चित असतो. गीतेच्या शिकवणीनुसार, या अपरिहार्य कारणांसाठी शोक करण्याची गरज नाही. ही एक अपरिहार्यता आहे आणि जीवनाच्या चक्राचा अविभाज्य भाग आहे. यातून मनुष्याला दु:खाशिवाय दुसरे काहीही मिळणार नाही.

Geeta Updesh : 'या' ६ गुणांमुळे होते चांगल्या व्यक्तीची ओळख, आयुष्यभर सुखी राहतात असे लोक!

होणाऱ्या वेदना स्वीकारा!

महाभारतातील कौरव-पांडवांच्या युद्धात आपण रणभूमीवर आपल्या प्रियजनांची हत्या केली, असं अर्जुनाला वाटू लागलं . यामुळे अर्जुन अतिशय दुःखी झाला आणि त्याला युद्ध करणे अत्यंत कठीण वाटू लागले. या काळात श्रीकृष्णाने त्याला समजावून सांगितले. श्रीकृष्ण म्हणाले की, जीवनाच्या प्रत्येक क्षणात मृत्यू आहे आणि मृत्यू अनिवार्य आहे. म्हणूनच दुःखाला स्वीकारणे आवश्यक आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाच्या अनित्यतेची आणि कर्तव्याची महत्त्वाची शिकवण दिली.

श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की, ‘तुमचे कर्तव्य हाच तुमचा धर्म आहे, त्याला न चुकता पार पाडा.’ कर्मयोगाच्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी अर्जुनाला त्याच्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करण्याचे, आणि फलप्राप्तीची चिंता न करता कर्म करण्याचे सांगितले. यामुळे अर्जुनाला स्थिर मनाने आपले कर्तव्य पार पाडण्याचे बळ मिळाले. श्रीकृष्णाच्या उपदेशाने अर्जुनाचे दुःख कमी झाले आणि त्याने रणभूमीवर लढायला निघण्याचा निर्धार केला. अर्जुनाने श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनानुसार युद्धात भाग घेतला आणि कर्तव्याचे पालन केले.

Whats_app_banner