Geeta Updesh: ‘या’ गोष्टी आयुष्याला करतात उद्ध्वस्त; गीतेत भगवान श्रीकृष्णाने दिलेली महत्त्वाची शिकवण ऐकलीत?-geeta updesh in marathi these things destroy life have you heard the important teachings given by lord krishna in gita ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: ‘या’ गोष्टी आयुष्याला करतात उद्ध्वस्त; गीतेत भगवान श्रीकृष्णाने दिलेली महत्त्वाची शिकवण ऐकलीत?

Geeta Updesh: ‘या’ गोष्टी आयुष्याला करतात उद्ध्वस्त; गीतेत भगवान श्रीकृष्णाने दिलेली महत्त्वाची शिकवण ऐकलीत?

Sep 04, 2024 06:03 AM IST

Geeta Updesh In Marathi: गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारा जीवनात कधीही निराश होत नाही. गीतेत श्रीकृष्णाने भविष्यासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

Geeta Updesh In Marathi: ‘या’ गोष्टी आयुष्याला करतात उद्ध्वस्त
Geeta Updesh In Marathi: ‘या’ गोष्टी आयुष्याला करतात उद्ध्वस्त

Geeta Updesh In Marathi: श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान कृष्णाच्या शिकवणीचे वर्णन लिखित स्वरुपात करण्यात आले आहे, जे त्यांनी महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनला दिले होते. गीता हा सर्वात प्रभावशाली ग्रंथ आहे. भगवद्गीतेला ‘भगवंताचे गीत’ देखील म्हणतात. महाभारताचे युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुनला आपले कुटुंबीय, गुरू आणि मित्र समोर पाहून लढायला संकोच वाटला आणि त्याने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना जीवनातील विविध पैलू, कर्तव्ये आणि धर्म यांचे ज्ञान दिले. गीतेतील मौल्यवान शिकवण माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. गीता जीवनात धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देते. गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारा जीवनात कधीही निराश होत नाही. गीतेत श्रीकृष्णाने भविष्यासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

भविष्याबद्दल काय सांगतात भगवान श्रीकृष्ण?

भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की, भविष्याचे दुसरे नाव संघर्ष आहे. जर मनुष्याची एखादी इच्छा पूर्ण झाली नाही, तर त्याचे हृदय भविष्यातील गोष्टींचे नियोजन करू लागते. भविष्यात आपली इच्छा पूर्ण होईल, अशी त्याची कल्पना असते. पण जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात. आपल्या समोर असलेल्या या क्षणांचा अनुभव घेण्याचे नावच जीवन आहे, हे तो विसरून जातो. गीतेत श्रीकृष्णाने मानवाच्या नाशाची पाच कारणे सांगितली आहेत. गीतेमध्ये असे लिहिले आहे की, जर एखाद्या व्यक्तीला अति झोपेची, रागाची, भीतीची, थकवाची आणि काम पुढे ढकलण्याची सवय असेल, तर त्या व्यक्तीचे भविष्य उद्ध्वस्त होते.

Geeta Updesh: भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या ‘या’ गोष्टी नेहमी ठेवा लक्षात, आयुष्यात येईल सुखच सुख!

पैशाने नसते खरी श्रीमंती!

श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटले आहे की, माणूस केवळ पैशाने श्रीमंत होत नाही, तर खरा श्रीमंत तो माणूस आहे ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार आहेत. श्रीकृष्ण म्हणतात की, माणसाने कोणत्याही परिस्थितीत धीर सोडू नये. जोपर्यंत तुमचे विचार आणि वागणूक चांगली होत नाहीत, तोपर्यंत तुमचे चांगले दिवस येत नाहीत.

‘अशा’वेळी कोणताही निर्णय घेऊ नका!

गीतेमध्ये असे लिहिले आहे की, जेव्हा तुम्ही खूप आनंदी किंवा खूप दुःखी असता, तेव्हा कोणताही निर्णय घेऊ नये. कारण या दोन्ही परिस्थिती तुम्हाला योग्य निर्णय घेऊ देत नाहीत. जर तुमच्यात स्वतःला बदलण्याची ताकद नसेल तर तुम्हाला देव किंवा नशिबाला दोष देण्याचा अधिकार नाही. प्रत्येक व्यक्तीने आपल्या भीतीचे धैर्यात रूपांतर केले पाहिजे, तरच तो प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो.