Geeta Updesh In Marathi: श्रीमद भगवद्गीता हा सनातन धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादाचे वर्णन केले आहे. महाभारताच्या युद्धापूर्वी माधवने अर्जुनचे खचलेले मनोबल वाढवण्यासाठी आणि त्याला या जगाचे सत्य सांगण्यासाठी गीता उपदेश सांगितला होता. त्याच वेळी, त्यांनी आपले वैश्विक रूप अर्जुनासमोर प्रकट करून, त्याला जगाचे खरे रूप दाखवले होते. गीतेच्या शिकवणीत स्त्रियांबद्दल अशा अनेक गुप्त गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, ज्या नेहमी रहस्यच राहिल्या आहेत. ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही. चला जाणून घेऊया स्त्रीयांच्या अशाच काही गोष्टींबद्दल...
गीता उपदेशात भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की, स्त्री अर्धपोटी जगू शकते, पण तिला प्रेम वाटून घ्यायला सांगितले, तर ती ते करू शकत नाही. ती एका व्यक्तीवर प्रेम करते आणि त्या व्यक्तीला आपलं सर्वस्व मानते. मानसशास्त्रातही असे म्हटले आहे की, स्त्रियांना त्यांच्या प्रेमाचा पूर्ण वाटा हवा असतो. तिचा जोडीदार इतर कोणत्याही व्यक्तीसोबत असणे तिला सहन होत नाही, मग ती त्याची मैत्रीण असो किंवा इतर कुणी.
भगवत गीतेचा उपदेश करताना माधव म्हणाले की, महिला कधीही कर्ज घेत नाहीत. ती कोणाकडूनही कर्ज घेण्याचे टाळते. परंतु, परिस्थितीने तिला तसे करण्यास भाग पाडले, तर ती ते जास्त काळ आपल्याजवळ ठेवत नाही. ती निव्वळ रकमेसह दुप्पट कर्ज परत करते. हे प्रेम, आदर, आनंद आणि द्वेष या सर्व गोष्टींना लागू होते. जर तुम्ही प्रेमात तिचा विश्वासघात केलात, तर ती त्या बदल्यात दुहेरी द्वेष दाखवू शकते.
भगवान श्रीकृष्णाच्या मते, स्त्रियांचा आदर केला पाहिजे, जर तुम्ही आदर कराल तर तुम्हाला त्यांच्याकडून आदर मिळेल. असं म्हणतात की, एखादी स्त्री तुम्हाला घडवू शकते, तसंच ती तुम्हाला बिघडवू देखील शकते. जर ती गप्प असेल, तर तिचा गैरफायदा घेऊ नका. कारण, जेव्हा ती कालीचे रूप धारण करते, तेव्हा तुमचे नुकसान होऊ शकते. म्हणून नेहमीच तिचा आदर करा, मग ती तुमच्या कुटुंबातील स्त्री असो वा अनोळखी. ही सुद्धा तुमच्या चांगल्या वागणुकीची ओळख आहे.
भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की, जेव्हा एखादी मुलगी एखाद्यावर खरोखर प्रेम करते, तेव्हा ती त्याच्याबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होते. ती तिच्या प्रियकराची किंवा पतीची प्रत्येक गरज पूर्ण करते. जर, आपली जवळची व्यक्ती आजारी पडली, तर ती काळजीत राहते आणि रात्रभर तिची सेवा करण्यात व्यस्त राहते, त्यामुळे अशा मुलींची कधीही फसवणूक करू नये.
बहुतेक मुली ज्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्या नजरेला नजर देऊ शकत नाहीत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, हे एक रहस्य आहे. जे फार कमी लोकांना माहीत आहे. स्त्रियांमध्ये खूप लाजाळूपणा असतो आणि त्यांना समाजाशी कसे वागावे, हे माहित असते. म्हणूनच त्यांना आपल्या आवडत्या व्यक्तीच्या डोळ्यात जास्तवेळ पाहता येत नाही.