भगवद्गीता हा हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. असे मानले जाते की गीतेतील अनमोल ज्ञान जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात लागू केले, तर तो प्रत्येक संकटावर मात करू शकतो. पाच हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रात अर्जुनाला हे ज्ञान दिले. वेळेचा योग्य वापर करून यश कसे मिळवता येते, हे गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे. कृष्णाच्या मते, कोणीही गीता वाचली, तर या ज्ञानाचा कधीही नाश होऊ शकत नाही. चला तर मग जाणून घेऊया की, कुठलाही मनुष्य का उद्ध्वस्त होतो? काय आहेत याची कारणे आणि गीतेत याबद्दल काय म्हटले आहे...
भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की, जो मनुष्य काम पूर्ण न करता लवकर थकतो, अशा व्यक्तीचा लवकरच नाश होतो. जर एखादी व्यक्ती उत्साही राहिली नाही, तर ती वयाच्या आधीच म्हातारी दिसू लागते. वेळ निघून गेल्यावरही अशा माणसाला काम करायचे असले, तरी ते काम करू शकत नाही. अशी व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही.
श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की, ज्याला प्रत्येक गोष्टीचा राग येतो आणि रागाच्या भरात कोणाचे तरी नुकसान होते, अशा माणसाला विनाशापासून कोणीही वाचवू शकत नाही. श्रीकृष्ण म्हणतात की, क्रोधामुळे माणूस कुटुंबात आणि समाजात मान गमावतो. रागामुळे माणसाचे मित्रही शत्रू होतात. त्यामुळे मानवाने आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे.
श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की, भीतीही माणसाचा नाश करते. भयभीत असलेली व्यक्ती योग्य विचार करू शकत नाही किंवा चुकीच्या गोष्टीला विरोध करू शकत नाही. एवढेच नाही तर भीतीच्या नियंत्रणाखाली असलेली व्यक्ती आपले हक्कही बजावू शकत नाही. अशी व्यक्ती आयुष्यात पुढे जाण्यास सक्षम नाही आणि ती जीवनात कधीही यशस्वी होऊ शकत नाही.
श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की, झोप हा दुर्गुण आहे जो मनुष्याच्या उत्तम जीवनाचाही नाश करतो. श्रीकृष्णाच्या मते, जो व्यक्ती आपल्या झोपेवर मात करत नाही, तो नेहमी इतरांच्या मागे राहतो. अशा परिस्थितीत माणसाला नाश टाळायचा असेल, तर आधी झोप सोडावी लागेल.
गीतेच्या मते, जो व्यक्ती आळसामुळे आपले काम दुसऱ्या दिवसासाठी पुढे ढकलतो, असा व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही. श्रीकृष्ण सांगतात की, काळ कोणासाठीही थांबत नाही, त्यामुळे मनुष्याने आपले काम वेळेवर पूर्ण केले नाही, तर त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि शेवटी असा माणूस बरबाद होतो.
संबंधित बातम्या