Geeta Updesh: भगवद्गीतेतील ‘या’ ४ श्लोकांमध्ये दडलेय सुखी आणि यशस्वी जीवनाचे रहस्य! जाणून घ्या...-geeta updesh in marathi the secret of a happy and successful life is hidden in these 4 verses of the bhagavad gita ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: भगवद्गीतेतील ‘या’ ४ श्लोकांमध्ये दडलेय सुखी आणि यशस्वी जीवनाचे रहस्य! जाणून घ्या...

Geeta Updesh: भगवद्गीतेतील ‘या’ ४ श्लोकांमध्ये दडलेय सुखी आणि यशस्वी जीवनाचे रहस्य! जाणून घ्या...

Sep 15, 2024 07:39 AM IST

Geeta Updesh In Marathi:असे मानले जाते की, केवळ भगवत गीतेतील काही गोष्टी समजून घेऊन त्यांचे जीवनात पालन केल्याने माणूस यशस्वी जीवन जगू शकतो.

Geeta Updesh In Marathi
Geeta Updesh In Marathi

Geeta Updesh In Marathi: गीतेतील श्लोक माणसाला आपले जीवन योग्य मार्गाने जगण्यासाठी मार्गदर्शन करतात. अशा परिस्थितीत जर कोणी या ज्ञानाचा आपल्या जीवनात अवलंब केला, तर त्याचे जीवन यशस्वी होऊ शकते. गीता हे १८ अध्याय आणि ७०० श्लोक असलेले एक महान पुराण आहे, जे मनुष्याला त्याच्या कर्माचे महत्त्व समजावून सांगते. महर्षि वेद व्यास यांनी श्रीमद्भागवत गीतेत कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाचे सारथी बनलेल्या भगवान श्रीकृष्णाने त्यांना दिलेल्या शिकवणुकीचे संकलन केले. गीतेत ज्ञानयोग, कर्म, राज आणि भक्तियोग यांचा सुंदर उल्लेख आहे. असे मानले जाते की केवळ भगवत गीतेतील काही गोष्टी समजून घेऊन त्यांचे जीवनात पालन केल्याने माणूस यशस्वी जीवन जगू शकतो. चला तर मग जाणून घेऊया त्या ४ श्लोकांबद्दल ज्यामध्ये सुखी आणि यशस्वी आयुष्याचे रहस्य दडलेले आहे…

 

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जन:।

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते।।

अर्थ- गीतेच्या या श्लोकाचा अर्थ असा आहे की, महापुरुष जे काही उदात्त कार्य करतात, इतर सामान्य लोकही त्याचप्रमाणे वागतात. महापुरुषांनी घालून दिलेली उदाहरणे पाहून संपूर्ण मानव समाज त्याच गोष्टींच्या मागे लागतो.

 

चिन्तया जायते दुःखं नान्यथेहेति निश्चयी।

तया हीनः सुखी शान्तः सर्वत्र गलितस्पृहः।।

अर्थ- गीतेच्या या श्लोकातून हे स्पष्ट करण्यात आले आहे की, दु:ख हे केवळ चिंतेमुळे उद्भवते, इतर कोणत्याही कारणाने नाही. म्हणून जो मनुष्य ही चिंता सोडून देतो तो सर्वत्र सुखी, शांतीमय व दुर्गुणांपासून मुक्त होतो.

 

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि।।

अर्थ- या श्लोकाचा अर्थ असा आहे की, मनुष्याला फक्त त्याच्या कृतींवर अधिकार आहे, परंतु आपण आपल्या कृतींचे परिणाम जाणून घेऊ शकत नाही. म्हणूनच श्रीकृष्णाने सांगितले आहे की, तुमचे काम करत राहा आणि परिणामाची चिंता करू नका. तसेच आळशी होऊ नका.

 

यत्साङ्‍ख्यैः प्राप्यते स्थानं तद्यौगैरपि गम्यते।

एकं साङ्‍ख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति।।

अर्थ- गीतेच्या या श्लोकातून असे स्पष्ट केले आहे की, जे ज्ञान सांख्ययोगींना प्राप्त होते, तेच ज्ञान कर्मयोगींनाही प्राप्त होते. म्हणून जो व्यक्ती सांख्य आणि कर्मयोगाला समान मानतो तोच खरा यशस्वी ठरतो.

Whats_app_banner