Geeta Updesh : असा माणूस कोणत्याही कामासाठी योग्य नाही, 'या' गोष्टी बनवतात त्याला अपंग! श्रीकृष्ण म्हणतात...
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : असा माणूस कोणत्याही कामासाठी योग्य नाही, 'या' गोष्टी बनवतात त्याला अपंग! श्रीकृष्ण म्हणतात...

Geeta Updesh : असा माणूस कोणत्याही कामासाठी योग्य नाही, 'या' गोष्टी बनवतात त्याला अपंग! श्रीकृष्ण म्हणतात...

Jan 10, 2025 08:14 AM IST

Geeta Updesh In Marathi : गीतेचा उपदेश महाभारताच्या काळात जितका समर्पक होता, कलियुगातही तितकाच महत्त्वाचा आहे. गीतेच्या शिकवणीत माणसाचे सद्गुण आणि दुर्गुण दोन्ही सांगितले आहेत.

Geeta Updesh In Marathi
Geeta Updesh In Marathi

Geeta Teachings In Marathi : श्रीमद्भगवद्गीता जीवनाच्या प्रत्येक पैलूवर भाष्य करते. ती आपल्याला केवळ ज्ञानाचे शब्दच सांगत नाही, तर जीवन जगण्याची कला देखील शिकवते. भगवद्गीतेचे पठण करणारी व्यक्ती मानसिक शांती, स्थिरता आणि आत्मविश्वास प्राप्त करू शकते. गीतेच्या या शिकवणी जीवनमूल्ये, कर्म, धर्म, योग, अध्यात्म आणि भक्ती मार्गावर आधारित आहेत. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश सांगितला होता. पण, हा उपदेश जगातील प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शन करतो. गीतेची शिकवण महाभारताच्या काळात जितकी महत्त्वाची होती, तितकीच या कलियुगात आहे. गीतेच्या शिकवणीत माणसाचे सद्गुण आणि दुर्गुण दोन्ही सांगितले आहेत. भगवान श्रीकृष्ण गीतेद्वारे समजावून सांगतात की, ज्या व्यक्तीकडे ‘या’ गोष्टी आहेत, तो अपंग व्यक्तीसारखा असतो.

काय सांगतात भगवान श्रीकृष्ण? 

> भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, जो मनुष्य जास्त विश्रांती घेतो त्याचा काही उपयोग नाही. कोणत्याही शारीरिक मेहनतीशिवाय तो अपंग किंवा दुर्बल बनतो. जी व्यक्ती कोणतेही काम करताना आळशीपणा दाखवते. ती प्रत्येक कामात मागे पडते. आशा व्यक्तीला वेळेवर काहीच मिळत नाही.

> श्रीमद्भगवद्गीतेमध्ये असे सांगितले आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीवर जास्त प्रेम होते तेव्हा तो अपंग होतो. अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीवर अती प्रेम करू नये. अनेकदा पालक आपल्या मुलांचे खूप लाड करतात, जे लहान मुलांसाठी खूप हानिकारक ठरते. अशी मुलं मोठी झाल्यावर बिघडण्याची शक्यता असते.

Geeta Updesh: 'असे' लोक नेहमीच होतात अयशस्वी; कोणत्याही कामात मिळत नाही यश! श्रीकृष्ण म्हणतात...

> भगवद्गीतेत असे म्हटले आहे की, यशस्वी झाल्यानंतर जर एखादी व्यक्ती अहंकारी झाली आणि लहान-मोठ्याचे कौतुक करायला विसरली, तर समजा की ती व्यक्ती मनाने अपंग झाली आहे. कारण ती व्यक्तीच अहंकारी आहे, जिच्यामध्ये कोणाबद्दलही करुणेची भावना नसते.

> भगवद्गीतेनुसार, ज्याला दुसऱ्या व्यक्तीबद्दल जास्त आसक्ती असते, तो व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमकुवत होतो.  कारण एखाद्या व्यक्तीवर जास्त आसक्ती ठेवल्याने माणूस कोणतेही काम करण्यास अक्षम होतो. असे लोक त्यांच्या ध्येयापासून दूर जातात.

> श्रीमद्भगवद्गीतेनुसार , क्रोधित स्वभावाची व्यक्ती मानसिक विकाराची शिकार बनते, कारण क्रोधित व्यक्ती केवळ स्वतःचे नुकसान करते. यामुळे व्यक्तीचे केवळ शारीरिकच नाही तर, मानसिक नुकसान होते.

Whats_app_banner