जगातील महान विद्वान श्रीमद्भागवतगीता श्लोक वाचतात आणि त्यांचे पालन करतात. गीता श्लोकांमध्ये आपल्या सर्व समस्या एका क्षणात सोडविण्याची क्षमता आहे. अशा परिस्थितीत, श्रीमद्भागवत गीतेतील काही श्लोक तुम्हाला जीवनातील सर्वात कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करतात.
श्रीमद्भागवत गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेल्या मौल्यवान उपदेशाचा संग्रह आहे. भारतीय परंपरेत गीतेला उपनिषद आणि धर्मसूत्रांचे स्थान आहे. आज ते केवळ भारतापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर देश-विदेशातही गीता पाठ करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जेव्हा महाभारताचे विनाशकारी युद्ध होणार होते आणि अर्जुन लढण्यास नकार देत होता. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी गीता श्लोकाद्वारे अर्जुनाला समजावून सांगितले. जाणून घ्या योग्य कर्माबद्दल गीता उपदेशात काय सांगितले आहे.
या श्लोकाचा अर्थ असा आहे की, तुमचा अधिकार फक्त तुमच्या कर्मावर आहे, तुमच्या कर्माच्या फळावर कधीही नाही. म्हणून, परिणामांच्या फायद्यासाठी कार्य करू नका. एखाद्याने एखाद्या विशिष्ट कार्याचे परिणाम आणि फायद्यांवर लक्ष केंद्रित न करता स्वतःच्या कार्यांवर आणि जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
गीतेमध्ये असे म्हटले आहे की, योग्य कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमीच योग्य असतात, तर योग्य कर्म ती असते ज्याचा हेतू कधीही चुकीचा नसतो.
श्रीकृष्ण म्हणतात की, जर तुमचा विवेक आणि तुमचा हेतू स्पष्ट असेल तर कोणी तुम्हाला चांगले किंवा वाईट म्हटले तरी फरक पडत नाही. तुम्ही इतरांच्या विचाराने नव्हे तर तुमच्या हेतूने ओळखले जाल.
गीतेत लिहिले आहे की, प्रत्येक व्यक्तीने चांगले असले पाहिजे, चांगल्या मार्गावर चाललं पाहिजे. चांगल्याशी चांगुलपणानं वागलं पाहिजे, परंतु वाईटाशी आपणही वाईट कधीही असू नये. तुमचे विचार नेहमी चांगले असले पाहिजेत.
गीतेत श्रीकृष्णाने पाच गुण सांगितले आहेत जे प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहेत. हे शांतता, सौम्यता, मौन, आत्म-नियंत्रण आणि शुद्धता आहेत. गीताच्या मते, या पाच गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या मनाला शिस्त लावतात. ज्या व्यक्तीमध्ये हे सर्व गुण नाहीत तो कधीही योग्य मार्गावर चालू शकत नाही.
श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की, प्रत्येक व्यक्तीचे भाग्य हे त्याच्या भूतकाळातील कर्माचे फळ असते. आज आपण केलेली कृती आपला उद्या ठरवेल. म्हणून माणसाने नेहमी सत्कर्म करावे.
गीतेमध्ये असे म्हटले आहे की, कोणीही कोणत्याही व्यक्तीचे भाग्य बदलू शकत नाही. तथापि, कोणी त्याला चांगली प्रेरणा देऊन मार्गदर्शन करू शकते. श्रीकृष्णाच्या मते, आयुष्यात कधी संधी मिळाली तर कोणाचा सारथी बनणे हा स्वार्थ नाही.
डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.