Geeta Updesh : अशा व्यक्तीला यश मिळणे उपयोगाचे नसते! गीता उपदेशात श्रीकृष्ण म्हणतात…
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : अशा व्यक्तीला यश मिळणे उपयोगाचे नसते! गीता उपदेशात श्रीकृष्ण म्हणतात…

Geeta Updesh : अशा व्यक्तीला यश मिळणे उपयोगाचे नसते! गीता उपदेशात श्रीकृष्ण म्हणतात…

Published Feb 09, 2025 09:54 AM IST

Geeta Updesh In Marathi : गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो माणसाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो. गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात, तरच ती व्यक्ती यशस्वी मानली जाते.

गीता उपदेश
गीता उपदेश

श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणुकीचे वर्णन आहे. गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनला महाभारत युद्धाच्या वेळी दिली होती. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. गीतेची शिकवण जो आपल्या जीवनात अंगीकारतो त्याला खूप प्रगती होते.

गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मानवाला जगायला शिकवतो. गीता जीवनातील धर्म, कृती आणि प्रेमाचे धडे देते. गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात, तरच ती व्यक्ती यशस्वी मानली जाते.

यस्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः । आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥

या श्लोकाचा अर्थ असा आहे की, जो मनुष्य आत्म्यामध्ये रमतो, आत्म्यामध्ये तृप्त होतो आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्म लहान-मोठे नाही.

गीता उपदेश -

श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले की, कोणतीही व्यक्ती तेव्हाच यशस्वी मानली जाते जेव्हा त्याच्यात नम्रता असते. अहंकारी माणसाने आयुष्यात कितीही यश मिळवले तरी त्याच्यात इतरांबद्दल प्रेम आणि आदर नसेल तर त्याचे यश व्यर्थ आहे.

गीतेत श्रीकृष्णाने प्रेमाची योग्य व्याख्या दिली आहे. श्रीकृष्णाच्या मते, प्रेमाचा अर्थ एखाद्याला मिळवणे नसून त्याच्यामध्ये हरवून जाणे आहे. श्रीकृष्ण म्हणतात की प्रेमात त्याग करावा लागतो. प्रेम हिसकावून घेण्याची किंवा मागितली जाणारी गोष्ट नाही, तर प्रेम म्हणजे त्याग आहे.

श्रीकृष्ण म्हणतात की, कोणत्याही व्यक्तीशी जास्त आसक्ती ठेवू नये कारण जास्त आसक्ती हानिकारक ठरते. गीतेत असे लिहिले आहे की अति आसक्ती माणसाला आशेकडे घेऊन जाते आणि ही आशाच दु:खाचे कारण बनते.

श्रीकृष्ण म्हणतात की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय स्वतः घ्यावेत कारण भविष्यात त्या व्यक्तीला पश्चाताप होत नाही. त्यामुळे स्वतःमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते.

गीतेत सांगितले आहे की, व्यक्तीने तामसिक आणि असंयमी आहारापासून स्वतःला दूर ठेवावे. अशा अन्नामुळे मनात अस्वस्थता आणि सदोष विचार निर्माण होतात, ज्यामुळे विचार विकृत होतो.

भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात की, प्रत्येक कामासाठी एक नियम असावा. कोणतेही काम नियमित आणि त्याच वेळी केल्याने त्याची सवय होऊन जाते. कोणतीही साधना तेव्हाच यशस्वी होते जेव्हा नियमांचे पालन केले जाते.

 

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

Priyanka Chetan Mali

TwittereMail

प्रियंका माळी ही हिंदुस्तान टाइम्स -मराठीमध्ये कन्टेन्ट रायटर असून ती राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषयांचा अभ्यास करून योग्य ती अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहचवत असते. प्रियंकाने बी कॉम आणि पत्रकारिता डिप्लोमा कोर्स केला असून ती ५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. एका स्थानिक मीडिया चॅनलमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून प्रियंकाने करिअरची सुरूवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स (डिजिटल) मध्ये भविष्य सेक्शनसाठी कन्टेन्ट रायटर म्हणून २ वर्ष काम केले आहे. प्रियंकाला फावल्या वेळेत वाचन करण्याची आणि कविता लिहिण्याची आवड आहे.

Whats_app_banner