Geeta Updesh In Marathi : श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी जीवन जगण्याची कला स्पष्ट केली आहे. जी व्यक्ती गीतेचे सार आपल्या जीवनात अंमलात आणते, ती एक दिवस नक्कीच यशस्वी होते. रणांगणात आपले नातेवाईक, भाऊबंध आणि गुरु शस्त्र घेऊन लढाईसाठी सज्ज झाले आहेत, हे पाहताच अर्जुनाचे मनोधैर्य डळमळू लागले. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला गीतेचा उपदेश सांगितला. भगवान श्रीकृष्णाचे बोल ऐकून तो रणांगणात युद्धासाठी सज्ज झाला. असे मानले जाते की जीवनातील प्रत्येक समस्येचे समाधान श्रीमद भागवत गीतेत सापडते. गीतेची शिकवण लोकांसाठी मार्गदर्शक ठरते. अशा स्थितीत गीतेमध्येच अशा काही शिकवण आहेत ज्यामुळे आपले भरकटणारे मन देखील शांत होऊ शकते. मन भरकटायला लागले तर, श्रीमद भागवत गीतेच्या या शिकवणीकडे अवश्य लक्ष दिले पाहिजे.
श्रीमद भागवत गीतेमध्ये असे लिहिले आहे की, मनुष्याने परिणामाची चिंता न करता स्वतःचे कार्य करावे. जेव्हा एखादी व्यक्ती कोणतेही काम त्याच्या परिणामाची चिंता न करता करते तेव्हा त्याचे मन शांत राहते. मन फारसे भटकत नाही. यामुळे व्यक्ती तणावमुक्त राहते. आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकते.
गीतेच्या शिकवणीत सांगितले आहे की, व्यक्तीने कोणतेही काम कोणत्याही स्वार्थाशिवाय करावे. अशा स्थितीत जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही इच्छा किंवा स्वार्थापोटी कोणतेही काम केले तर त्याचे मन कधीही शांत राहत नाही. त्याचे मन नेहमी अस्थिर असते. या गोष्टीचा त्या व्यक्तीला सतत त्रास देखील होत राहतो.
सुख आणि दु:ख हे एका चक्रासारखे आहे. जे मानवी जीवनात येतच असतात. अशा स्थितीत माणूस सुख-दु:खाची परिस्थिति समान मानून राहिला तर, त्याचे मन फारसे भटकत नाही. गीतेत सांगितले आहे की, माणसाने सुखात अहंकारी बनू नये आणि दु:खात कधी विचलित होऊ नये.
श्रीमद भागवत गीतेमध्ये सांगितले आहे की, माणसाची ईश्वरावर श्रद्धा असावी. देवावर श्रद्धा असलेल्या व्यक्तीचे मन फारसे अस्वस्थ होत नाही.
श्रीमद भागवत गीतेनुसार ज्ञान प्राप्त करण्यात मग्न असलेल्या व्यक्तीचे मन फारसे भटकत नाही. त्याचे मन स्थिर राहते. त्यामुळे नेहमी काहीना काही शिकायचं प्रयत्न करा.
संबंधित बातम्या