Geeta Updesh : ऐकून घेण्याची क्षमता ठेवा; आयुष्य होईल सफल! श्रीकृष्णाने गीतेत दिलेली ‘ही’ शिकवण आजही फायद्याची
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : ऐकून घेण्याची क्षमता ठेवा; आयुष्य होईल सफल! श्रीकृष्णाने गीतेत दिलेली ‘ही’ शिकवण आजही फायद्याची

Geeta Updesh : ऐकून घेण्याची क्षमता ठेवा; आयुष्य होईल सफल! श्रीकृष्णाने गीतेत दिलेली ‘ही’ शिकवण आजही फायद्याची

Published Oct 22, 2024 08:08 AM IST

Geeta Updesh In Marathi :श्रीमद्भगवद्गीतेतील श्रीकृष्णाची शिकवण केवळ रणांगणावरच नाही, तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करते.

Geeta Updesh In Marathi
Geeta Updesh In Marathi

Geeta Updesh In Marathi : आपल्यापैकी अनेकजण लहानपणापासून श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ वाचत आलो आहेत. जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यात चांगले आणि उदात्त व्हायचे असेल, तर तो संस्कृत भाषेत लिहिलेल्या गीतेतील शिकवणी वाचू शकतो.  हा हिंदू धर्मातील अतिशय पवित्र ग्रंथ आहे. यात एकूण १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत, जे भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणात सांगितले होते. खरं तर, महाभारत युद्धात, अर्जुन त्याच्या नातेवाईक आणि गुरुंविरुद्ध लढण्यापूर्वी नैतिक संकटात अडकला होता. आपल्या प्रियजनांना युद्धासाठी तयार झालेले पाहून अर्जुन अत्यंत दुःखी आणि व्याकूळ झाला. आपल्या कुटुंबाला युद्धभूमीवर शत्रू म्हणून पाहण्यास त्याचं मन धजावतच नव्हतं. अशावेळी अर्जुनाने या विषयावर त्याचा मित्र आणि सारथी श्री कृष्ण यांच्याशी चर्चा केली. यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले. श्रीकृष्णाने अर्जुनला समजावून सांगितले की, क्षत्रिय या नात्याने राज्याला सर्वोत्तम राजा प्रदान करणे आणि अन्याय रोखणे हे त्याचे कर्तव्य आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला हेही शिकवले की, कर्म अर्थात करणे हा मनुष्याचा धर्म आहे. परंतु, त्याच्या परिणामाची चिंता करणे योग्य नाही. या प्रवचनानंतर अर्जुनने मनातील शंका दूर करून युद्ध करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाभारताचे हे युद्ध १८ दिवस चालले, ज्यामध्ये पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरची शिकवण

श्रीमद्भगवद्गीतेतील श्रीकृष्णाची शिकवण केवळ रणांगणावरच नाही तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करते. श्रीकृष्ण म्हणतात की, एखाद्याला नुसतंच ऐकण्यापेक्षा त्याचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण, प्रत्येकालाच जेवढे वाटते, तेवढे सांगता येत नाही.

Geeta Updesh : भगवान श्रीकृष्ण म्हणतात मनुष्याने जीवनात केले पाहिजेत ‘हे’ बदल; तरच होईल दुःखाचा नाश!

‘यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति।

तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति।।‘

म्हणजेच, ‘जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्यामध्ये सर्वकाही पाहतो त्याला मी कधीही अदृश्य वाटत नाही आणि तोही माझ्यासाठी अदृश्य नाही.’ या श्लोकाचा अर्थ असा आहे की, आपण स्वतःला इतरांमध्ये आणि इतरांना स्वतःमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

 

विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि।

शुनि चैव श्वपाके च पंडिता: समदर्शिन:।।

भगवान श्रीकृष्ण म्हणतात, इतरांचे नुसते ऐकण्याऐवजी त्यांच्या मनातील भावना, त्यांची परिस्थिती आणि त्यांचे अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Whats_app_banner