Geeta Updesh : श्रीमद्भागवत गीतेतील हे श्लोक देतात खास शिकवण, मुलांचा हट्ट नक्की दूर होईल!-geeta updesh in marathi good thoughts of bhagavadgita for kids to know ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : श्रीमद्भागवत गीतेतील हे श्लोक देतात खास शिकवण, मुलांचा हट्ट नक्की दूर होईल!

Geeta Updesh : श्रीमद्भागवत गीतेतील हे श्लोक देतात खास शिकवण, मुलांचा हट्ट नक्की दूर होईल!

Sep 17, 2024 10:26 AM IST

Geeta Updesh In Marathi : भगवत गीतेमध्ये श्रीकृष्ण केवळ कार्य करण्याची प्रेरणा देतात. गीतेतील अनेक श्लोक जीवनविषयक तत्त्वज्ञानाची प्रचिती देतात. त्यात अनेक श्लोक आहेत जे मुलांसाठी खूप उपयुक्त ठरतील. हे श्लोक मुलांचा हट्ट दूर करण्यासाठी उपयोगी ठरतील.

गीता उपदेश
गीता उपदेश

आज बदलत्या काळानुसार आजची पिढी देखील बदलत चालली आहे. सोशल मिडीयाचे सर्वच आधीन होत चालले आहे. मुलांचे हट्ट वाढत चालले आहे. मोठ्यांसोबतच मुलांनी देखील गीतेतील हे श्लोक समजून घेतले पाहिजे. 

बदलत्या काळात मुलांना फोनचे व्यसन लागत चालले आहे. मोबाईल फोनमुळे मुलांसोबत मोठेही या व्यसनाला बळी होत चालले आहेत. यामुळे परस्पर संवाद कमी होत चालला आहे, नात्यात दुरावा निर्माण होत चालला आहे. बैठकी आणि मैदानी खेळ खेळण्यातला रस कमी होतो आहे. तसेच, हट्टासोबतच मुलांना कुठेतरी संस्कारांची जाण नाही आहे असेही दिसून येत आहे. 

मुलं ऐकत नाही त्यामुळे आपण त्यांचे हट्ट पुरवतो पण कुठेतरी यामुळे आपल्यावरच नको ते हट्ट पुरवण्याची वेळ येत आहे. मुलांचा फोनचा वापर इतका वाढत चालला आहे की, त्यांच्यात मूल्यांचा अभाव असल्याचे आढळून येत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना श्रीकृष्णाने दिलेले हे उपदेश सांगावे. गीतेचे हे श्लोक शिकवावेत आणि समजावून सांगावेत. या श्लोकांमुळे त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा येईल.

श्लोक :

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥

अर्थ :

मुलांना अशी सवय असते की त्यांनी कोणतेही काम केले तर ते त्याच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत असतात. अशा परिस्थितीत हा श्लोक त्यांना खूप उपयोगी पडू शकतो. या श्लोकाचा अर्थ असा आहे की तुमचा अधिकार फक्त तुमच्या कृतीवर आहे, तुमच्या कृतीच्या फळावर कधीही नाही. म्हणून, परिणामांच्या इच्छेसाठी कृती करू नका.

श्लोक :

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते।

सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते॥

अर्थ

वस्तूंचा सतत विचार केल्याने माणूस त्यांच्याशी संलग्न होतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होतात आणि त्यांच्या इच्छांमध्ये अडथळा निर्माण होऊन क्रोध निर्माण होतो. म्हणून, कोणत्याही गोष्टीच्या आसक्तीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि कामात मग्न राहा. एखादी गोष्ट पाहताच मुलं हट्ट करू लागतात. आणि जेव्हा ते मिळत नाही तेव्हा ते लवकर रागावतात. अशी परिस्थिती टाळण्यासाठी हा श्लोक उत्तम आहे.

गीता उपदेश 

एखाद्या गोष्टीचा सतत विचार केल्याने माणूस त्या गोष्टीशी संलग्न होतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये भावना निर्माण होतात. ती वस्तू न मिळाल्याने त्या भावनेचे रूपांतर क्रोधात होते. त्यामुळे माणसाने कोणत्याही गोष्टीच्या मोह करू नये.

एखादी गोष्ट मीळाली नाही तर क्रोध वाढतो, त्यामुळे कोणतिही गोष्ट करताना त्याचे परिणाम पाहू नये आणि चांगले फळ मिळण्याच्या अपेक्षेने ते कृत्य करू नये.

Whats_app_banner
विभाग