Geeta Updesh: ‘या’ गोष्टींचा विचार करून वेळ वाया घालवू नका! गीता उपदेशात भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात...
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: ‘या’ गोष्टींचा विचार करून वेळ वाया घालवू नका! गीता उपदेशात भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात...

Geeta Updesh: ‘या’ गोष्टींचा विचार करून वेळ वाया घालवू नका! गीता उपदेशात भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात...

Published Sep 10, 2024 05:52 AM IST

Geeta Updesh In Marathi: ज्याप्रमाणे माणूस जुने कपडे टाकून नवीन वस्त्रे परिधान करतो. त्याचप्रमाणे आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. हे सांगताना त्यांनी अर्जुनला कर्तव्य बजावण्याचे महत्त्व सांगितले.

Geeta Updesh In Marathi
Geeta Updesh In Marathi

Geeta Updesh In Marathi: आपल्या सर्वांना लहानपणापासूनच श्रीमद भगवद्गीता शिकवली जाते, ज्यामध्ये एकूण १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत. भारतीय हिंदू धर्मातील हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. आता त्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले असले तरी, मूळ गीता ही केवळ संस्कृत भाषेतच तयार झाली आहे. कुरुक्षेत्राच्या मैदानात सुमारे ४५ मिनिटांत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला गीतेचे ज्ञान दिले होते, ज्यामध्ये कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली होती. त्याने सार्वभौमिक स्वरूप देखील प्रकट केले आणि स्पष्ट केले की आत्मा अमर आणि अविनाशी आहे, तर शरीर नश्वर आहे. श्रीकृष्णाने हे उदाहरणही दिले की, ज्याप्रमाणे माणूस जुने कपडे टाकून नवीन वस्त्रे परिधान करतो. त्याचप्रमाणे आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. हे सांगताना त्यांनी अर्जुनला कर्तव्य बजावण्याचे महत्त्व सांगितले.

श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणुकीचे वर्णन आहे. गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनला महाभारत युद्धाच्या वेळी दिली होती. गीतेतील प्रत्येक श्लोक आणि त्याचा अर्थ जीवनातील सकारात्मक बदलाला पाठिंबा देणारे आहे. हे ज्ञान किंवा गुण जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते.

Geeta Updesh : कर्म कधीही व्यर्थ आणि निष्फळ ठरत नाही! जाणून घ्या श्रीकृष्णाने दिलेला हा उपदेश

कर्तव्य हाच धर्म!

भगवान श्रीकृष्णाने स्पष्ट केले की, प्रत्येक व्यक्तीचा धर्म कर्तव्य बजावणे आणि अर्जुनाचा धर्म क्षत्रिय म्हणून लढणे आहे. अर्जुनाने आपल्या कर्तव्यापासून दूर राहिल्यास ते त्याच्या धर्माच्या विरुद्ध झाले असते. युद्धात योद्धा मारला गेला तर स्वर्ग प्राप्त होतो आणि जिंकला तर पृथ्वीवर राज्य मिळते, असेही श्रीकृष्ण म्हणाले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लढणे हे योद्ध्याचे कर्तव्य असते.

‘या’ गोष्टीत वेळ नका घालवू

गीतेच्या शिकवणीनुसार, ज्या गोष्टी तुम्ही कधीही बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करून वेळ वाया घालवू नका. ज्या गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवू शकतो आणि ज्यामध्ये आपण सकारात्मक बदल घडवून आणू शकतो, त्यावर आपण आपले लक्ष आणि ऊर्जा केंद्रित केली पाहिजे. ज्या गोष्टी आपण कधीच बदलू शकत नाही, त्याबद्दल विचार करून वेळ वाया घालवल्याने आपली मानसिक शांतता नष्ट होते आणि आपल्याला विनाकारण चिंता वाटते.

गीतेत श्रीकृष्ण अर्जुनला शिकवतात की, आपण आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, त्याच्या परिणामावर नाही. आपण वर्तमानात राहून आपले कर्तव्य बजावले पाहिजे आणि आपल्या प्रयत्नात प्रामाणिकपणे आणि समर्पणाने कार्य केले पाहिजे.

Whats_app_banner