Geeta Updesh In Marathi: प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यश मिळवायचे असते. त्यासाठी प्रत्येक जण खूप प्रयत्नही करतो. परंतु, अनेक वेळा रात्रंदिवस मेहनत करूनही आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही. यामुळे आपल्या जीवनात प्रचंड निराशा येते. अशा परिस्थितीत माणसाने संयम बाळगून निर्णय घेतले पाहिजेत. या काळात झालेली कोणतीही चूक तुमच्या भविष्यावर परिणाम करू शकते. असे म्हणतात की, जीवनात जेव्हा सर्व बाजूंनी निराशा येते आणि आपली हिंमत खचायला लागते, तेव्हा माणसाने सकारात्मक राहायला हवे. अशावेळी सकारात्मक राहण्यासाठी दररोज गीता पठण करावे. गीता वाचल्याने आणि त्यातील विचार अंगिकारल्याने जीवनात यश मिळू शकते. यासोबतच जीवनातील अनेक समस्यांवर उपायही सापडतात आणि विचार करण्याची, समजून घेण्याची क्षमता वाढते.
भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन करते. महाभारत युद्धासाठी जेव्हा अर्जुनाची पावले डळमळू लागली, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला गीतेचा पाठ सांगितला. भगवान श्रीकृष्णाची शिकवण ऐकूनच अर्जुनने आपले ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल केली. श्रीकृष्णाने सांगितलेल्या काही गोष्टी आजच्या प्रतिकूल परिस्थितीतही मानवाला उपयुक्त आहेत. असे मानले जाते की, या शिकवणीचे पालन केल्याने मोठ्या समस्या देखील दूर होऊ शकतात.
> भगवद्गीतेतील शिकवणीनुसार, परिस्थिती कशीही असो, माणसाला राग येऊ नये. लोभ आणि क्रोध हे नरकाचे दरवाजे आहेत.
> अनेक वेळा मेहनत आणि प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. अशा वेळी निराश होण्याऐवजी चांगले काम करत राहिले पाहिजे. गीतेतील शिकवणीच्या मते, कोणतेही काम परिणामाची चिंता न करता केले पाहिजे. या सगळ्याची फळे एक दिवस तुम्हाला नक्कीच मिळतील.
> गीतेत सांगितल्यानुसार, कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी एक योजना तयार केली पाहिजे. कोणत्याही योजनेशिवाय काम केल्याने नेहमीच समस्या निर्माण होतात आणि त्याचा फायदा व्यक्तीला मिळत नाही.
> माणसाने आपल्या जीवनात नेहमी चांगले कर्म केले पाहिजे. तुम्हाला चांगल्या कर्मांचे फळ नक्कीच मिळते. हे फळ तुमच्यासाठी फायदेशीरच असते. जीवनातील सर्वात मोठी कृती म्हणजे दान आहे. प्रत्येकाने गरजूंना दान करावे, यामुळे शुभ फळ मिळते.
> अनेकदा यश न मिळाल्यावर माणूस खचून जायला लागतो. अशी व्यक्ती पुन्हा प्रयत्न करण्यासाठी खूप मेहनत घेते, परंतु त्यावेळी त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव असतो. गीतेनुसार, जेव्हा सर्व बाजूंनी संकटे येतात आणि माणूस तुटू लागतो, तेव्हा देव नेहमी त्याच्यासोबत असतो. त्यामुळे देवावर श्रद्धा ठेवावी.