Geeta Updesh : आयुष्यात सतत चिंताग्रस्त राहताय? मग, अर्जुनाच्या ‘या’ प्रश्नाला भगवान श्रीकृष्णानं दिलेलं उत्तर वाचाच!-geeta updesh in marathi constantly worried in life then read lord krishna s answer to arjuna s this question ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : आयुष्यात सतत चिंताग्रस्त राहताय? मग, अर्जुनाच्या ‘या’ प्रश्नाला भगवान श्रीकृष्णानं दिलेलं उत्तर वाचाच!

Geeta Updesh : आयुष्यात सतत चिंताग्रस्त राहताय? मग, अर्जुनाच्या ‘या’ प्रश्नाला भगवान श्रीकृष्णानं दिलेलं उत्तर वाचाच!

Oct 01, 2024 07:45 AM IST

Geeta Updesh In Marathi:श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादाचे वर्णन आहे. हे वाचून मानवाला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात.

गीता उपदेश
गीता उपदेश

Geeta Updesh In Marathi: श्रीमद्भगवद्गीता हा भारतीय धर्मशास्त्रातील प्रमुख ग्रंथांपैकी एक आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादाचे हे वर्णन आहे. महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाचा उद्देश, कर्म, भक्ती आणि ज्ञान याविषयी उपदेश केला होता, ज्यामध्ये जीवनाचे सार आहे. हे वाचून मानवाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. आज आपण अर्जुनने श्रीकृष्णाला विचारलेल्या एका प्रश्नाबद्दल जाणून घेऊया, ज्याच्या उत्तराने तुमच्या मनातील संदिग्धता संपेल.

खरं तर, हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात वारंवार येतो की, जे लोक चांगले कार्य करतात आणि धर्माच्या मार्गावर चालतात, त्यांना जीवनात अनेकदा समस्यांना सामोरे जावे लागते. धर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांची प्रत्येक पायरीवर परीक्षा असते. पण, तरीही ते आनंदी राहतात, असे का? अर्जुनानेही हाच प्रश्न भगवंताला विचारला होता, ज्याचे उत्तर श्रीकृष्णाने अर्जुनाला दिले होते.

श्रीकृष्णाने दिले ‘हे’ उत्तर!

या प्रश्नावर श्रीकृष्णांनी हसत हसत उत्तर दिले की, माणूस जसे विचार करतो तसे काहीच घडत नाही. कधी कधी अज्ञानामुळे त्याला आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींचे सत्य समजू शकत नाही. त्यामुळे त्यांना वाटते की, त्यांचे चांगले असणे त्यांच्यासाठी वाईट आहे, परंतु तसे नाही. वास्तविक, प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते. निसर्ग प्रत्येकाला स्वतःचा मार्ग निवडण्याची संधी देतो आणि तो कोणता मार्ग निवडतो यावर ते अवलंबून असते. जे चांगले कर्म करतात त्यांना देव नक्कीच प्रतिफळ देतो. देव कधी आणि कोणत्या स्वरूपात आपल्याला फळ देतो हे समजत नाही. परंतु, देवाचे आशीर्वाद त्याच्यावर नेहमीच राहतात.

­­­Geeta Updesh : ‘या’ ५ चुका करतात मनुष्याचं आयुष्य उद्ध्वस्त! श्रीकृष्णाने भगवद्गीतेत दिलाय मोलाचा उपदेश

गीतेची ‘ही’ शिकवण अंगीकारावी!

जरी तुम्ही नेहमी चिंतेत असाल तरीही परिणामांची चिंता न करता चांगले कर्म करत राहा. कारण त्याचा परिणाम जीवनात कधीतरी नक्कीच मिळेल. जर तुम्ही सत्याच्या मार्गावर चालत असाल आणि काही कारणास्तव तुम्हाला खोटे बोलावे लागले, तर या असत्याचे काय परिणाम होतील याचा एकदा विचार करा. खोटे बोलणे तेव्हाच योग्य आहे, जेव्हा ते एखाद्याचे जीवन वाचवू शकते. 

जर, तुमचे जीवन संकटांनी भरलेले असेल आणि तुम्हाला नेहमीच अपमानित व्हावे लागत असेल, तर ते सकारात्मकपणे घ्या. कदाचित तुम्हाला भविष्यात चांगले परिणाम मिळतील. म्हणून धर्माचा मार्ग सोडून अधर्माच्या वाटेवर कधीही जाऊ नका.

Whats_app_banner