Geeta Updesh: मनावर नियंत्रण ठेवणे का आहे महत्त्वाचे? गीतेत काय म्हणाले भगवान श्रीकृष्ण? वाचा...
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: मनावर नियंत्रण ठेवणे का आहे महत्त्वाचे? गीतेत काय म्हणाले भगवान श्रीकृष्ण? वाचा...

Geeta Updesh: मनावर नियंत्रण ठेवणे का आहे महत्त्वाचे? गीतेत काय म्हणाले भगवान श्रीकृष्ण? वाचा...

Published Jul 17, 2024 05:50 AM IST

Geeta Updesh In Marathi: भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की, कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी मनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

Geeta Updesh In Marathi
Geeta Updesh In Marathi

Geeta Updesh In Marathi: श्रीमद भागवत गीता भगवान कृष्णाच्या शिकवणीचे वर्णन करते, जी त्यांनी महाभारताच्या युद्धाच्या वेळी अर्जुनला दिली होती. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. असे मानले जाते की गीतेचे पालन केल्याने जीवनात अमुलाग्र बदल घडून येतात. इतकंच नाही तर, माणसाला प्रत्येक कामात यश मिळते. श्रीमद भागवत गीतेच्या त्या मौल्यवान मंत्रांबद्दल जाणून घेऊया जे, आपल्याला जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. भगवदगीतेत श्रीकृष्णाने मनावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व सांगितले आहे. चला जाणून घेऊया श्रीकृष्ण नक्की काय सांगतात…

मनावर नियंत्रण ठेवणे का महत्त्वाचे आहे?

भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की, कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी मनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. काम करताना तुमचे मन नेहमी शांत आणि स्थिर असले पाहिजे. क्रोधामुळे बुद्धीचा नाश होतो आणि त्यामुळे केलेले कामही बिघडते. त्यामुळे नेहमी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

श्रीमद भागवत गीतेनुसार कोणतेही काम फळाची इच्छा किंवा अपेक्षा न ठेवता केले पाहिजे. तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल, तर फक्त तुमच्या कृतीवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या मनातील इतर कोणताही विचार तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करू शकतो.

Rudraksha : कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी धारण करा रुद्राक्ष! वाचा आश्चर्यकारक फायदे

कर्मावर संशय घेऊ नये!

गीतेच्या शिकवणीनुसार, व्यक्तीने कधीही आपल्या कर्मावर संशय घेऊ नये. असे केल्याने माणूस स्वतःचा नाश करतो. त्यामुळे तुम्हाला यश मिळवायचे असेल, जे काही काम कराल ते पूर्ण आत्मविश्वासाने आणि कोणत्याही शंकांशिवाय पूर्ण करा. गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की, मनुष्याने कोणत्याही गोष्टीवर जास्त आसक्ती ठेवू नये. ही आसक्तीच माणसाच्या दु:खाचे आणि अपयशाचे कारण आहे. जास्त आसक्ती माणसामध्ये राग आणि दुःखाची भावना निर्माण करते. यामुळे तो आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणून माणसाने अती आसक्ती टाळावी.

श्रीकृष्णाच्या मते, कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी व्यक्तीने स्वतःमध्ये दडलेले भय नाहीसे केले पाहिजे. हा धडा देताना कृष्णाने अर्जुनला सांगितले की हे अर्जुन, निर्भयपणे युद्ध कर. युद्धात मृत्यू आला तर, स्वर्ग मिळेल आणि जिंकलात तर पृथ्वीवर राज्य मिळेल. त्यामुळे मनातील भीती काढून टाका.

Whats_app_banner