Geeta Updesh In Marathi: भगवद्गीता हा असा ग्रंथ आहे, ज्याची वेगळी ओळख देण्याची गरज नाही. माणसाने नीतिमत्त्वाने कसे चालावे आणि परिपूर्ण जीवन कसे जगावे, याची शिकवण भगवद्गीतेत दिली आहे. भगवद्गीतेमध्ये असे अनेक श्लोक आहेत, जे युद्धासोबतच कौटुंबिक संबंधांचे आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील अनेक धडे देतात. हे श्लोक मानवी जीवन सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. जेव्हा आयुष्य निराशाजनक वाटू लागतं, जेव्हा तुम्हाला एखाद्या कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो, तेव्हा भगवद्गीतेतील काही श्लोक तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात. भगवद्गीतेच्या या श्लोकांचे नियमित पठण केल्याने तुमच्यातील नकारात्मक विचार नक्कीच दूर होतील.
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतशाक्षः।
वीतरागभयक्रोधः स्थिधीर्मुनिरुच्यते ।
हा फक्त एक श्लोक नाही तर, चांगला मंत्र आहे, ज्याने मन दु:खातही अविचल राहते. या स्तोत्राचा अर्थ असा आहे की जो आसक्ती, भय आणि क्रोधमुक्त असतो, त्याला स्थिर ज्ञानी ज्ञानी म्हणतात. रागामुळे माणसाच्या चांगुलपणा नाहीसा होतो. हा मंत्र सांगतो की, रागाने बोललेल्या शब्दांमुळे आपल्याला नंतर पश्चाताप होऊ शकतो. अशा परिस्थितीत शांत राहण्यासाठी या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला सतत स्थैर्य मिळेल. रागावर नियंत्रण ठेवता येईल.
कार्पण्यदोषोपहतस्वभावः प्रिच्छमि त्वं धर्मसंमुदाचेतः।
यच्रेयः स्यानिश्चितम् ब्रूहि तन्मे शिष्यस्ते यम साधि पुरुष तरवम्।
या श्लोकाचा उच्चार करणे थोडे कठीण असले, तरी त्याचा खूप खोल अर्थ आहे. ‘मी माझा संयम गमावला आहे. मी तुम्हाला विनंती करतो की, या परिस्थितीत माझ्यासाठी काय चांगले आहे ते सांगा. कृपया मला याचे ज्ञान द्या’, अशी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विनंती केली. यातून हे सांगितले गेले आहे की, जेव्हा शंका असेल तेव्हा तुम्ही देवाला विचारावे. जेव्हा तुम्ही घाबरता आणि गोंधळात असतात, तेव्हा आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही. अशा वेळी आपण कोणताही निर्णय घेण्यास कचरतो. अशा वेळी कोणीतरी हात धरून मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा असते. जेव्हा त्याचे कर्तव्य नैतिक अस्पष्टतेत अडकलेले असते, तेव्हा अर्जुन सल्ल्यासाठी कृष्णाकडे वळतो. त्यामुळे तुम्ही देखील तुमचा संभ्रम दूर करण्यासाठी तुम्हीही देवाकडे वळावे.
वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः।
बहो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ।
भीतीमुळे आपल्या विचारांवर मर्यादा येतात. यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास उशीर होतो. या भीतीमुळे आयुष्यात पुढे जाता येत नाही. म्हणून हा श्लोक भक्तीद्वारे भीतीपासून मुक्त होण्याचा सल्ला देतो. देवावर लक्ष केंद्रित करून, तुम्ही तुमच्या भीतीवर मात करू शकता.
संबंधित बातम्या