Geeta Updesh: श्रीकृष्णाने सांगितलेले भगवद्गीतेतील ‘हे’ ५ श्लोक महत्त्वाचे; जीवनातील अनेक अडचणी करतील दूर!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: श्रीकृष्णाने सांगितलेले भगवद्गीतेतील ‘हे’ ५ श्लोक महत्त्वाचे; जीवनातील अनेक अडचणी करतील दूर!

Geeta Updesh: श्रीकृष्णाने सांगितलेले भगवद्गीतेतील ‘हे’ ५ श्लोक महत्त्वाचे; जीवनातील अनेक अडचणी करतील दूर!

Published Jul 09, 2024 05:50 AM IST

Geeta Updesh In Marathi: श्रीमद भगवद्गीता या पवित्र ग्रंथात कठीण प्रसंगी हार न मानता जीवनात सुख,समृद्धी आणि यश प्राप्त करण्याची शिकवण देणाऱ्या अनेक श्लोकांचे वर्णन केले गेले आहे.

श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेतील ‘हे’ ५ श्लोक महत्त्वाचे; जीवनातील अनेक बाधा करतील दूर!
श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेतील ‘हे’ ५ श्लोक महत्त्वाचे; जीवनातील अनेक बाधा करतील दूर!

Geeta Updesh In Marathi: श्रीकृष्णाचा जन्म द्वापर युगात झाला. त्यांच्या जीवनातील अनेक पौराणिक कथा लोकप्रिय आहेत. श्रीमद भगवद्गीता या पवित्र ग्रंथात कठीण प्रसंगी हार न मानता जीवनात सुख, समृद्धी आणि यश प्राप्त करण्याची शिकवण देणाऱ्या अनेक श्लोकांचे वर्णन केले गेले आहे. गीतेतील काही महत्त्वाचे श्लोक आणि त्यांचा अर्थ जाणून घेऊया...

 

जब जब होई धरम की हानि, 

बाढ़हिं असुर अधम अभिमानी,

तब-तब प्रभु धरि विविध सरीरा, 

हरहिं कृपानिधि सज्जन पीरा॥

या श्लोकाचा अर्थ असा आहे की, जेव्हा जेव्हा धर्म नष्ट होईल आणि लोकांमध्ये पाप करण्याची प्रवृत्ती वाढू लागेल. तेव्हा तेव्हा परमेश्वर वेळोवेळी वेगवेगळी रूपे घेऊन लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अवतार घेईल.

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। 

अभ्युथानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।

परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृताम्। 

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥

या श्लोकात श्रीकृष्णाने आपल्या पृथ्वीवरील अवताराबद्दल सांगितले आहे. श्रीकृष्ण अर्जुनला सांगतात की, जेव्हा पृथ्वीवर पाप वाढत जाईल. ऋषी-मुनींना त्रास दिला जाईल, त्यावेळी भगवान श्रीकृष्ण धर्माची स्थापना करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतील.

 

क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।

स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति॥

या श्लोकाचा अर्थ असा आहे की, क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जास्त रागामुळे माणसाला योग्य-अयोग्य ओळखण्यात अडचणी येतात. राग हा माणसाच्या यशाच्या मार्गात अडथळा असतो. रागावर नियंत्रण ठेवून तुम्ही जग जिंकू शकता.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि॥

या श्लोकात श्रीकृष्णाने सांगितले आहे की, मनुष्याला फक्त काम करण्याचा अधिकार आहे. म्हणून, तुम्ही तुमचे काम करा आणि फळाचा विचार करू नका किंवा तुम्हाला कामाची आसक्ती नाही.

 

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते।

सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते॥

भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनावर ताबा ठेवा. काहीही साध्य करण्याची अवाजवी इच्छा बाळगू नका. यामुळे ते साध्य करण्याच्या इच्छेपासून मन विचलित होईल आणि इच्छा पूर्ण न झाल्यास मन उदासीन राहील. मन नाराज राहील. क्रोधामुळे माणसाचे मन भ्रष्ट होते.

Whats_app_banner