Geeta Updesh: संपत्ती आणि धनाचे माप पैसा नाही! भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: संपत्ती आणि धनाचे माप पैसा नाही! भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

Geeta Updesh: संपत्ती आणि धनाचे माप पैसा नाही! भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

Jul 10, 2024 05:00 AM IST

Geeta Updesh In Marathi: भगवद्गीता हे कृष्णाने कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाला दिलेल्या सल्ल्याचे प्रतीक आहे. यात भगवान श्रीकृष्णाने असे म्हटले आहे की, धन केवळ पैशाने मोजता येत नाही.

संपत्ती आणि धनाचे माप पैसा नाही! भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
संपत्ती आणि धनाचे माप पैसा नाही! भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

Geeta Updesh In Marathi: भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की, काळ कसा बदलतो आणि केव्हा बदलतो हे कोणालाही समजत नाही आणि कुणी ते सांगूही शकत नाही. जसा श्रीरामाचा राज्याभिषेक रात्रीच ठरला होता. पण, भगवान रामाला पहाटेच वनवासात जावे लागले. गीता सांगते की, आपण केवळ आपले काम करत राहिले पाहिजे. त्यातून योग्य ते फळ आपल्याला मिळणारच आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणातात की, ‘पैसा हे संपत्तीचे एकमेव माप नाही. जो माणूस चांगले वागतो आणि चांगले काम करतो तोच खरा श्रीमंत असतो. हे गुण नसलेली व्यक्ती नेहमीच गरीब असते.’

भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर, तुम्ही बलवान व्हाल. तुम्ही इतरांवर अवलंबून राहाल तर, ते तुम्हाला शक्तिशाली बनवू शकत नाही. आयुष्यात कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आधी आत्मविश्वास असायला हवा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, काहीही करण्याआधी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. भूतकाळ आपल्याला जीवन समजून घेण्याची चांगली संधी देतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात की, आज अर्थात वर्तमान आपल्याला जीवन जगण्याची दुसरी संधी देते. म्हणूनच आपण दररोज भूतकाळात जगण्याऐवजी वर्तमानात जगायला शिकले पाहिजे. जास्त विचार न करता मनापासून जगायला शिकायला हवे.

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार व्यवसायासाठी 'ही' जागा असते सर्वोत्तम! वाढतो बिझनेस, मिळतो बक्कळ पैसा

तुमच्या कर्मांवर लक्ष केंद्रित करा!

गीता सांगते की, माणूस एकटाच जन्मतो आणि मृत्यूलाही एकटाच तोंड देतो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या-वाईट कर्माचे फळ मिळते. त्यामुळे इतरांच्या वर्तनाचे अनुसरण करण्याऐवजी तुम्ही तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा. एकट्याने चालायला कधीच घाबरू नका. भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की, खूप आनंद आणि खूप प्रेम माणसाला कमजोर करते. त्यामुळे अती सोयरिक आणि आपुलकी टाळली पाहिजे. अन्यथा, ते केवळ स्वतःचे जीवनच उद्ध्वस्त करतील, असे नाही तर ते इतरांनाही दुःख देतील.

Muharram : इस्लाममधील पहिला महिना 'मोहरम'ला सुरूवात! जाणून घ्या महत्व आणि मान्यता

भगवान श्रीकृष्णाने दिला उपदेश

महाभारताचे युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुनाने आपले धनुष्य टाकून माघार घेण्याचा विचार केला होता. युद्धाच्या रणांगणात आपल्या विरोधात आपलेच आप्तस्वकीय आहेत, त्यांच्याविरोधात शस्त्र कसे उचलायचे, असे वाटून अर्जुन हताश झाला होता. त्याने आपल्या नातेवाईकांशी युद्ध करण्यास नकार दिला होता. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने गीतेचे ज्ञान अर्जुनाला दिले. भगवद्गीतेमध्ये १८ अध्याय आणि ७२० श्लोक आहेत. गीतेतील शिकवण लोकांना चांगली व्यक्ती बनण्यास मदत करतात. जेव्हा या विचारांचे जीवनात पालन केले जाईल, तेव्हा माणूस शांततेने आणि अध्यात्मात रमून आपले सुंदर जीवन जगू शकतो.

Whats_app_banner