Geeta Updesh: जे लोक आनंद शोधतात ते कधीही इतरांवर टीका करत नाहीत! भगवद्गीतेतील ‘हे’ उपदेश वाचाच
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: जे लोक आनंद शोधतात ते कधीही इतरांवर टीका करत नाहीत! भगवद्गीतेतील ‘हे’ उपदेश वाचाच

Geeta Updesh: जे लोक आनंद शोधतात ते कधीही इतरांवर टीका करत नाहीत! भगवद्गीतेतील ‘हे’ उपदेश वाचाच

Jul 08, 2024 05:50 AM IST

Geeta Updesh In Marathi: महाभारतात युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुन आपल्या जवळच्या नातेवाईकांना युद्धभूमीवर पाहून निराश झाला, तेव्हा भगवान कृष्णाने दिलेला सल्ला म्हणजे ‘भगवद्गीता’. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, जे लोक जीवनात आनंद शोधतात ते इतरांवर टीका करत नाहीत.

जे लोक आनंद शोधतात ते कधीही इतरांवर टीका करत नाहीत! भगवद्गीतेतील ‘हे’ उपदेश वाचाच
जे लोक आनंद शोधतात ते कधीही इतरांवर टीका करत नाहीत! भगवद्गीतेतील ‘हे’ उपदेश वाचाच

Geeta Updesh In Marathi: भगवद्गीता हे कुरुक्षेत्र युद्धाच्या वेळी कृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशाचे प्रतीक आहे. अर्जुनाने प्रतिस्पर्धी कुळातील आपल्या नातेवाईकांशी लढण्यास नकार दिल्यावर भगवान कृष्ण पांडवांपैकी एक असलेल्या अर्जुनाला सल्ला देतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, ‘ज्यांना खऱ्या अर्थाने आनंदी व्हायचे आहे, ते कधीही इतरांवर टीका करत नाहीत. इतरांवर टीका केल्याने आपला आनंद हिरावून घेतला जातो.’ भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की, ज्या लोकांना आनंदी राहायचे आहे ते स्वतःच्या आनंदाबरोबरच इतरांच्या आनंदाची काळजी घेतात. या सोबतच भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेतून अर्जुनालाच नव्हे, तर अवघ्या मानवसृष्टीला जगण्याचा एक नवा मंत्र सांगत शिकवण दिली आहे.

तुलना करू नका!

भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, जीवनात स्वत:ची तुलना कोणाशीही करू नये. देवाने जे दिले आहे, त्यात आनंदी रहा. इतरांशी तुलना केल्यामुळे आपल्याला केवळ दुःखच मिळू शकते. जे स्वतःची इतरांशी तुलना करतात, ते कधीही आनंदी होऊ शकत नाहीत. शिवाय ते आपले कर्तव्य विसरतात.

Shani Rahu and Ketu Dosh Upay : तुमच्यावरही आहे शनी, राहू-केतूचा प्रकोप? घराजवळ 'हे' वृक्ष लावल्यास मिळेल आराम

तक्रार करू नका!

इतरांबद्दल तक्रार केल्याने तुम्हाला स्वतःबद्दल चांगले वाटते. पण, यामुळे समस्या सुटत नाही. आनंदी लोक सगळ्यांना समान समजतात. त्यांना कशाचीही तक्रार करावीशी वाटत नाही. त्यामुळे केवळ स्वतःच्या गोष्टींमध्ये लक्ष देऊन, त्या अधिकाधिक उत्कटपणे करण्याचा प्रयत्न करा.

भूतकाळाबद्दल काळजी करणे थांबवा!

भूतकाळातील घटनांबद्दल काळजी करण्यात काही अर्थ नाही. यात तुमचा वेळ वाया जाईल. याने तुम्हाला काही फायदा होणार नाही. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले की, आनंदाचा मार्ग म्हणजे भूतकाळातील घटना, परिस्थिती आणि नातेसंबंधांचा विचार न करता वर्तमानाच्या क्षणात जगणे.

Tulsi Upay : तुळशीची पाने तोडताना अजिबात करू नका 'या' चुका! घरात येते दारिद्रय, होतात अशुभ परिणाम

देवाला कोणतेही रूप नाही!

भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात की, ‘भगवंताला कोणतेही रूप नाही. जो कोणी त्याची कोणत्याही रूपात पूजा करतो, तो त्याला त्या रूपात आशीर्वाद देतो.’

महाभारताचे युद्ध सुरू होण्यापूर्वी, अर्जुनाला आपल्या वडिलांसमान लोकांना आणि गुरूंना युद्धभूमीवर पाहून अतीव दुःख होते. विरोधी गटातील लोक हे आपलेच नातेवाईक आहे, त्यांच्यावर शस्त्र कसे उगारणार, असं म्हणत तो निराश होतो. मात्र, तेव्हा सारथी असलेले भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगतात.

Whats_app_banner