Geeta Updesh: भगवान श्रीकृष्ण म्हणतात ‘या’ २ गोष्टींचं पालन आवर्जून करा, नातेसंबंध होतील आणखी मजबूत!-geeta updesh in marathi bhagavad gita lord krishna says follow these 2 things relationships will be stronger ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: भगवान श्रीकृष्ण म्हणतात ‘या’ २ गोष्टींचं पालन आवर्जून करा, नातेसंबंध होतील आणखी मजबूत!

Geeta Updesh: भगवान श्रीकृष्ण म्हणतात ‘या’ २ गोष्टींचं पालन आवर्जून करा, नातेसंबंध होतील आणखी मजबूत!

Aug 23, 2024 07:33 AM IST

Geeta Updesh In Marathi:आपले नातेसंबंध टिकवण्यासाठी आणि ते आणखी मजबूत बनवण्यासाठी गीतेमध्ये काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. चला जाणून घेऊया...

Geeta Updesh In Marathi: भगवान श्रीकृष्ण म्हणतात ‘या’ २ गोष्टींचं पालन आवर्जून करा
Geeta Updesh In Marathi: भगवान श्रीकृष्ण म्हणतात ‘या’ २ गोष्टींचं पालन आवर्जून करा

Bhagavad Gita Updesh In Marathi : आपल्याला लहानपणापासून श्रीमद्भगवद्गीतेचा पाठ शिकवला जातो. गीता हा सनातन धर्मातील महत्त्वाचा ग्रंथ आहे. यात एकूण १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत, जे संस्कृत भाषेत लिहिले गेले होते. परंतु, आता ते मराठी, हिंदी, इंग्रजीसह इतर अनेक भाषांमध्ये अनुवादित केले गेले आहेत. या ग्रंथात कर्मयोग, भक्ती योग आणि ज्ञानयोगाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. याशिवाय, मनुष्याला मोक्षप्राप्तीचे मार्ग देखील सांगण्यात आले आहेत. महाभारत युद्धापूर्वी अर्जुनाला त्याच्या कतृत्वाबद्दल शंका व संभ्रम होता. 

अर्जुन याच संभ्रमात शस्त्र खाली टाकणार होता. हे पाहून भगवान श्रीकृष्णाने त्याला जीवनाचे रहस्य सांगितले. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर आपले नातेवाईक, गुरु आणि मित्र युद्धासाठी तयार झालेले पाहून अर्जुन दुःखी आणि चिंताग्रस्त झाला होता. मात्र, त्याच्या सर्व चिंता संपवण्यासाठी गीतेचा उपदेश करण्यात आला. त्यानंतर या युद्धाला सुरुवात झाली होती. आपले नातेसंबंध टिकवण्यासाठी आणि ते आणखी मजबूत बनवण्यासाठी गीतेमध्ये काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. चला जाणून घेऊया...

नातेसंबंध आणखी मजबूत करण्यासाठी काय करावे?

> भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या उपदेशात सांगितले आहे की, माणसाने संयम आणि विश्वास दोन्ही ठेवला पाहिजे. त्यामुळे नाते जास्त काळ टिकते. उशिरा मिळाले असले तरी, चुकीच्या नात्यात कधीच अडकू नका. जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल काही शंका असेल, तर ते नाते ताबडतोब सोडून द्या. कारण नंतर नातं तुटण्यापेक्षा भविष्यात सर्वांसोबत तुमचाही जीव वाचवणे चांगले.

Geeta Updesh: गीतेत सांगितलेत जीवनाचे ३ महत्त्वपूर्ण धडे! दुर्लक्ष कराल तर भविष्यात होऊ शकते मोठे नुकसान

> गीतेच्या प्रवचनात भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की, व्यक्ती जेवढे पाळू शकेल, तेवढेच वचन दिले पाहिजे. कारण खोटी आशा भविष्यात नातेसंबंध कमकुवत करू शकते आणि एखाद्या व्यक्तीला वाईटरित्या तोडू शकते. यामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. कारण, तुमच्यासोबतच अनेक लोकही या नात्याशी जोडले गेले आहेत.

> भगवान श्रीकृष्णाच्या मते, जीवनातील प्रत्येक गोष्ट परत मिळवता येते. परंतु, काळाबरोबर गमावलेले नाते आणि विश्वास परत मिळवता येत नाही. योग्य मार्गाचा अवलंब करणे आणि सत्याशी एकनिष्ठ राहणे सर्वात महत्वाचे आहे. एकदा विश्वास गमावला आणि चुकीच्या मार्गाने नातं गमावलं की, ते परत मिळवणं खूप कठीण असतं.

> गीता उपदेशाच्या वेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, जर स्वाभिमानाची बाब असेल तर एखाद्या व्यक्तीला प्रेमातही नाकारले पाहिजे. कारण, स्वाभिमानापेक्षा मोठे काहीही नाही. जर, तुम्ही एकदा तुमचा स्वाभिमान गमावला, तर त्या व्यक्तीच्या नजरेत तुमची किंमत राहणार नाही आणि तो भविष्यात तुमचा आदर करणार नाही.