Geeta Updesh: वाईट कर्म म्हणजे मनावरचं ओझं; भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना काय म्हणाले?-geeta updesh in marathi bhagavad gita lord krishna says bad karma is a burden on the mind ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: वाईट कर्म म्हणजे मनावरचं ओझं; भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना काय म्हणाले?

Geeta Updesh: वाईट कर्म म्हणजे मनावरचं ओझं; भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना काय म्हणाले?

Aug 09, 2024 05:50 AM IST

Geeta Updesh In Marathi: गीता हा असा एकमेव धर्मग्रंथ आहे, जो मानवाला जगायला शिकवतो. गीता जीवनात धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देते.

Geeta Updesh In Marathi
Geeta Updesh In Marathi

Geeta Updesh In Marathi: श्रीमद भागवत गीता भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन करते. गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनला महाभारत युद्धाच्या वेळी दिली होती. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. गीतेचे वचन जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते. गीता हा असा एकमेव धर्मग्रंथ आहे, जो मानवाला जगायला शिकवतो. गीता जीवनात धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देते. गीतेमध्ये श्रीकृष्णाने जीवनात समस्या का निर्माण होतात आणि त्यावर उपाय काय हे सांगितले आहे. यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मोलाचा उपदेश दिला आहे.

काय म्हणाले भगवान श्रीकृष्ण?

> श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की, वाईट कर्म हे मनावर ओझे वाहून नेण्यासारखे आहे, हे नेहमी लक्षात ठेवावे. म्हणून, वाईट विचारांपासून तुमच्या मनाला नेहमी दूर ठेवा आणि त्यांच्या जागी चांगल्या विचारांना मनात जागा द्या.

> गीतेमध्ये असे लिहिले आहे की, प्रत्येक मनुष्याकडे मर्यादित वेळ असतो. त्यामुळे तो वेळ इतरांचे जीवन जगण्यात वाया घालवू नका.

> गीता सांगते की, प्रत्येक व्यक्तीने आपले कर्म विचार करूनच केले पाहिजे. कारण भविष्यात आपल्याला आपल्या कर्मानुसार त्याचे परिणाम भोगावे लागतात.

Nag Panchami : नागपंचमीच्या दिवशी तवा, चाकू का वापरत नाही? जाणून घ्या नागपंचमीची कथा

> श्रीकृष्ण म्हणतात की, या जीवनाचा आधार प्रेम आहे. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रेम असते, त्याच्याच जीवनात शांती असते. कारण, शांती तिथेच असते, जिथे प्रेमाला स्थान असते. जीवनात प्रेम नसेल, तर खूप काही मिळवूनही समाधान मिळत नाही.

> गीता उपदेशानुसार, आयुष्यातील एकमेव समस्या म्हणजे आपली चुकीची विचारसरणी. योग्य ज्ञान हे आपल्या सर्व समस्यांचे अंतिम समाधान आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, मनुष्याने आपल्या मनावर विश्वास ठेवू नये. कारण, मन मनुष्याचा पुन्हा पुन्हा विश्वासघात करते. मनाच्या ऐवजी कृतीवर लक्ष केंद्रित करणे हे प्रत्येक मानवाचे परम कर्तव्य असले पाहिजे.

> गीतेमध्ये असे लिहिले आहे की, जेव्हा माणसाच्या मनात अहंकार, मत्सर आणि द्वेष पूर्णपणे रुजतात, तेव्हा त्याचे पतन निश्चितच होते. या सर्व प्रवृत्ती माणसाला आतून वाळवीसारखं पोखरून पोकळ बनवतात.

> श्रीकृष्ण म्हणतात की, हे शरीर म्हणजे युद्धाचे क्षेत्र आहे. शरीरात दोन सेना आहेत, एक पांडव म्हणजे पुण्यवान आणि एक कौरव म्हणजे पापी. माणूस नेहमी दोघांमध्ये अडकलेला असतो.