Geeta Updesh In Marathi: श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान कृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे, जे त्यांनी महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनला दिले होते. गीतेत दिलेली ही शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. गीतेच्या श्लोकांमध्ये धर्माच्या मार्गावर चालत चांगले कर्म करण्याची शिकवण देण्यात आली आहे. जीवनातील सर्व दुविधा आणि समस्यांचे समाधान गीतेत सापडते. असे मानले जाते की, गीतेच्या शिकवणीचे पालन केल्याने जीवन बदलून जाते आणि माणसाला प्रत्येक कामात यश मिळते. श्रीमद भागवत गीतेच्या अनमोल विचारांबद्दल जाणून घेऊया...
> गीतेत लिहिले आहे, मानवी जीवनाचे अविभाज्य सत्य म्हणजे मृत्यू. हे सत्य माहीत असूनही, मनुष्याला त्याची भीती वाटते. मनुष्याच्या या भीतीने त्याचा वर्मान क्षणातील आनंदही बिघडून जातो. म्हणून माणसाने कधीही मृत्यूला घाबरू नये.
> भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की, क्रोधामुळे गोंधळ निर्माण होतो आणि गोंधळामुळे बुद्धीचा नाश होतो. जेव्हा बुद्धी चालत नाही, तेव्हा तर्काचा नाश होतो आणि माणसाची विवेकबुद्धी नष्ट होतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या रागावर नियंत्रण कसे ठेवायचे, हे जाणून घेतले पाहिजे. रागाच्या भरात घेतलेले निर्णय नेहमीच चुकीचे असतात आणि नंतर त्या व्यक्तीला पश्चाताप होतो.
> श्रीकृष्णाने म्हटले आहे की, कोणत्याही व्यक्तीने आपल्या कर्तव्याच्या मार्गापासून दूर जाऊ नये. जेव्हा कर्म मुक्त होते, तेव्हा माणूस त्याच्या मार्गापासून दूर जातो. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असेल आणि समाजात इतरांपेक्षा वेगळे स्थान निर्माण करायचे असेल, तर तुम्ही नेहमी तुमचे काम करत राहा.
> श्रीमद भागवत गीतेमध्ये असे लिहिले आहे की, प्रत्येक मनुष्याने स्वतःमध्ये काय आहे, हे पाहिले पाहिजे. आत्मज्ञानानेच माणसाला त्याचे गुण-दोष कळतात. आत्मनिरीक्षण माणसाला योग्य काय आणि चूक काय ते ठरवण्यास मदत करते. त्यामुळे प्रत्येकाने काही काळ एकटे राहून आत्मपरीक्षण करावे.
> मन खूप चंचल आहे आणि हे चंचल मन हेच दुःखाचे मुख्य कारण आहे. गीतेतील श्लोकाच्या मते प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. जो व्यक्ती आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो, तो यशाचा मार्ग धरू शकतो. अशी व्यक्ती केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करते आणि ध्येय सहज साध्य करते.
संबंधित बातम्या