Geeta Updesh In Marathi: भगवद्गीता हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ मानला जातो. श्रीमद्भागवत गीतेमध्ये भगवान कृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे, जे त्यांनी महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनला दिले होते. गीतेमध्ये धर्माच्या मार्गावर चालण्याची शिकवण देण्यात आली आहे. धर्मग्रंथानुसार, मनुष्याला त्याच्या सर्व समस्यांचे समाधान भगवद्गीतेमध्ये मिळू शकते. असे मानले जाते की, गीतेच्या शिकवणीचे पालन केल्याने जीवन बदलते आणि व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते. यासोबतच गीतेमध्ये काही यशाचे मंत्र देखील सांगण्यात आले आहेत, जे तुम्ही जीवनात लागू करू शकता.
श्रीमद भागवत गीतेनुसार, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, कोणतेही काम कधीही पुढे ढकलू नका. तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण केले पाहिजे, जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर त्याला नेहमीच यश मिळते. जर तुम्ही नेहमी तुमच्या कर्मापासून दूर पळत राहाल, तर तुम्ही जीवनात यश मिळवू शकणार नाही. गीतेमध्ये असे म्हटले आहे की, जर एखाद्या व्यक्तीची कृती योग्य दिशेने असेल, तर तो मोठ्या संकटांना देखील सहजपणे तोंड देऊ शकतो आणि त्याला कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही.
भगवान श्री कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की, प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कामात निपुण आहे किंवा सर्व काम योग्य पद्धतीने करू शकेलच असे नाही. त्यामुळे तुम्ही तुमची ताकद ओळखा आणि ज्या कामात तुम्ही चांगले आहात, तेच करण्याचा प्रयत्न करा. यात तुमचे यश निश्चित आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की, मला हे व्हायचं होतं आणि हे झालो. परंतु भगवान श्री कृष्ण म्हणतात की, तुम्ही ज्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतलात, तेच तुम्ही करू शकता.
भीती वाटण्यात काही नुकसान नाही, परंतु त्या भीतीला कधीही आपल्यावर वर्चस्व मिळवू देऊ नका. स्वतःवर नियंत्रण ठेवूनच यश मिळवणे शक्य आहे. माणसाचे मन जोपर्यंत त्याच्या नियंत्रणात असते, तोपर्यंतच ते त्याचे मित्र असते. जेव्हा तुमचं मन तुमच्या नियंत्रणाबाहेर जातं, तेव्हा ते तुमचं सर्वात मोठं शत्रू बनतं. म्हणूनच जोपर्यंत तुम्ही बरोबर आहात आणि आयुष्यात कोणतीही चूक करत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणालाही घाबरू नका.
संबंधित बातम्या