Geeta Updesh: भगवान श्रीकृष्णाच्या मते शूर लोकांची असते ‘ही’ विशेष ओळख! तुम्हाला माहीत आहे का?-geeta updesh in marathi bhagavad gita according to lord krishna brave people have this special identity ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: भगवान श्रीकृष्णाच्या मते शूर लोकांची असते ‘ही’ विशेष ओळख! तुम्हाला माहीत आहे का?

Geeta Updesh: भगवान श्रीकृष्णाच्या मते शूर लोकांची असते ‘ही’ विशेष ओळख! तुम्हाला माहीत आहे का?

Aug 24, 2024 07:51 AM IST

Geeta Updesh In Marathi: गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच महत्त्वाची आहे,ती माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. या शिकवणींचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात.

Geeta Updesh: भगवान श्रीकृष्णाच्या मते शूर लोकांची असते ‘ही’ विशेष ओळख!
Geeta Updesh: भगवान श्रीकृष्णाच्या मते शूर लोकांची असते ‘ही’ विशेष ओळख!

Geeta Updesh In Marathi: श्रीमद्भगवद्गीता हा सनातन धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. ज्यामध्ये धर्मयोग, कर्मयोग आणि भक्ती योगाचे तपशीलवार वर्णन केले आहे. यासोबतच मोक्षप्राप्तीचे मार्गही या ग्रंथात सांगितले आहेत. गीता उपदेश हे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादाचे तपशीलवार वर्णन आहे, जे महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुनाला देण्यात आले होते. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच महत्त्वाची आहे, ती माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. या शिकवणींचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात. जे गीतेची शिकवण अंगीकारतात, त्या व्यक्तीपासून राग, मत्सर या भावना दूर जातात. गीतेत भगवान श्रीकृष्णाने शूर व्यक्तींची विशेष ओळख सांगितली आहे. चला जाणून घेऊया.. 

काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण?

> गीता उपदेशाच्या मते, कोणतेही काम करताना तुम्हाला जर भीती वाटत असेल, तर लक्षात ठेवा की तुमचे काम खरोखरच शौर्याने भरलेले आहे. खरे तर कोणतेही काम करताना भीती असते, तेव्हा ते धैर्याने आणि कर्तव्याच्या भावनेने केले पाहिजे. कारण ही भीती आपल्यातील शौर्य आणि कर्तव्याची भावना बाहेर आणते.

Geeta Updesh: भगवान श्रीकृष्ण म्हणतात ‘या’ २ गोष्टींचं पालन आवर्जून करा, नातेसंबंध होतील आणखी मजबूत!

> गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, एखाद्या व्यक्तीची दृष्टी केवळ शारीरिक डोळ्यांपुरती मर्यादित नसते. तर, ती व्यक्तीच्या आंतरिक दृष्टीकोन आणि मानसिक स्थितीशी देखील जोडलेली असते. दृष्टी ही केवळ भौतिक डोळ्यांची दृष्टी नाही तर, ती मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या स्थितीशी देखील संबंधित आहे. म्हणून हे माणसाच्या भावना आणि मानसिक स्थितीवरून ठरवले जाते की, तुम्ही बाहेरचे जग कसे पाहता आणि अनुभवता.

> गीतेचा उपदेश सांगताना भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की, भोगातून मिळणारे सुख अल्पकाळासाठी असते, तर त्यागामुळे माणसाला कायमस्वरूपी सुख मिळते. म्हणून भगवंताच्या कृपेने जे मिळेल ते स्वीकारा. अन्यथा वाईट संगतीमुळे माणसाच्या कर्माचे नुकसान होऊन तो चुकीच्या मार्गावर चालू लागतो. त्यामुळे भविष्यात त्याची शिक्षा त्या व्यक्तीला भोगावी लागू शकते. म्हणून नेहमी देवाची उपासना करा. तो तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही. माणसाने वाईट संगत टाळा आणि भगवंताची भक्ती व कृपा श्रद्धेने आपले कर्तव्य पार पाडा. असे केल्याने जीवनात कायमस्वरूपी सुख आणि शांती प्राप्त होते.