मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: गीता उपदेशानुसार ‘या’ ५ स्त्रिया असतात आई समान! जाणून घ्या भगवद्गीतेत काय सांगितलंय...

Geeta Updesh: गीता उपदेशानुसार ‘या’ ५ स्त्रिया असतात आई समान! जाणून घ्या भगवद्गीतेत काय सांगितलंय...

Jul 11, 2024 05:50 AM IST

Geeta Updesh In Marathi: गीतेत अशा ५ महिलांबद्दल सांगितले आहे, ज्या प्रत्येकाच्या आयुष्यात मातेसमान आहेत. कोणत्या आहेत ‘या’ ५ स्त्रिया? जाणून घ्या...

Geeta Updesh In Marathi
Geeta Updesh In Marathi

Geeta Updesh In Marathi: ‘श्रीमद्भगवद्गीता’ हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा ग्रंथ आहे. महाभारतातील पांडव पुत्र अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातील संवादाचे यात तपशीलवार वर्णन आहे. गीतेमध्ये धर्म, कर्म, ज्ञान, भक्ती आणि त्याग या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. गीतेचं सार सांगताना भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप प्रकट केले होते, त्यानंतर अर्जुनला जीवनाचे रहस्य कळले. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात धर्माचे पालन केले पाहिजे. कारण धर्म आपल्याला योग्य मार्ग दाखवतो आणि योग्य कर्म करण्याची प्रेरणा देतो, असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. गीता केवळ धार्मिक जीवनाचे मार्गदर्शनच नाही, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठीही मार्गदर्शन करते.

भगवद्गीतेतील शिकवणींचे पालन करणारा प्रत्येक व्यक्ती जीवनात आनंद मिळवतो आणि एक आदर्श व्यक्ती बनतो. गीतेत अशा ५ महिलांबद्दल सांगितले आहे, ज्या प्रत्येकाच्या आयुष्यात मातेसमान आहेत. कोणत्या आहेत ‘या’ ५ स्त्रिया? जाणून घ्या...

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार व्यवसायासाठी 'ही' जागा असते सर्वोत्तम! वाढतो बिझनेस, मिळतो बक्कळ पैसा

राजाची पत्नी

भगवान श्रीकृष्णाच्या मते राजाच्या पत्नीला आईचा दर्जा देण्यात आला आहे. आई प्रमाणेच आपल्या साम्राज्याचा प्रेमाने सांभाळ करणाऱ्या मालकाच्या म्हणजेच राजाच्या पत्नीची अर्थात राणीची नेहमी पूजा करण्याचा सल्ला दिला गेला आहे. राणी नेहमी आपल्या आईप्रमाणे प्रजेच्या हिताचे निर्णय घेते, तेव्हा तिच्याकडे कधीही वाईट नजरेने बघू नये. अन्यथा, तुम्हाला वाईट परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

ट्रेंडिंग न्यूज

गुरूची पत्नी

गीता सांगताना भगवान श्रीकृष्णांनी सांगितले होते की, गुरूच्या पत्नीला नेहमी आईसारखे मानले पाहिजे. कारण, आपल्याला शिकवणाऱ्या प्रत्येक व्यक्ती या नेहमी ज्येष्ठ असतात. आपल्या शिक्षकांना वडिलांसारखे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या पत्नीलाही आईसारखे मानले पाहिजे.

Geeta Updesh: संपत्ती आणि धनाचे माप पैसा नाही! भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

मित्राची पत्नी

भगवान श्रीकृष्णांनी गीता उपदेश करताना सांगितले की, कुणीही आपल्या मित्राच्या पत्नीकडे कधीही चुकीच्या नजरेने पाहू नये. आपल्या भावाची किंवा मित्राची पत्नी ही नेहमी आपल्या आईसमान मानली पाहिजे. तिला कधीही वेदना होऊ देऊ नये.

सासू

भगवान श्रीकृष्णाच्या मते, पती किंवा पत्नीने आपल्या सासूला नेहमीच आई मानले पाहिजे. कारण, तिने आपल्या पोटच्या अपत्याला तुमचा जोडीदार म्हणून दिलेले असते. आपल्या मुलीला स्वतःपासून वेगळं करण्यासाठी मन मोठं असलं पाहिजे. म्हणूनच सासूला नेहमी आदर द्या, कारण आई कुणाचीही असली तरी ती आईच असते.

स्वतःची जन्मदात्री आई

आपल्याला जन्म देणारी आई प्रत्येकासाठी खूप मौल्यवान असते. कुणाचंही ऐकून आपल्या आईला अंतर देऊ नका. तुमच्या आईनेच ९ महिने तिच्या पोटात तुमचे पालनपोषण केले आणि तुम्हाला जन्म दिला. ज्या आईने तुम्हाला मोठे केले, त्या आईचा नेहमी आदर आणि सन्मान करा. कारण, या जगात आईपेक्षा मोठे कोणी नाही. तुम्ही कितीही दु:खी असलात, तरी तुमची आई नेहमीच तुमच्या पाठीशी उभी असते. त्यामुळे तिला कधीही दुखवू नका.

WhatsApp channel