Geeta Updesh In Marathi: श्रीमद भागवत गीता भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन करते. गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनला महाभारत युद्धाच्या वेळी दिली होती. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. गीतेचे वचन जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते. गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे, जो मानवाला जगायला शिकवतो. गीता मनुष्याला धर्म, कृती आणि प्रेमाचे धडे देते. गीतेमध्ये श्रीकृष्णाने जीवनात नातेसंबंधांचे महत्त्व काय आहे आणि कोणते नाते सर्वात उपयुक्त आहे हे सांगितले आहे.
> गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की, जगातील सर्व नातेसंबंध वेळेवर मदतीला येतीलच असे नाही. परंतु, भगवंताशी निगडित प्रत्येक नाते निश्चितच तुम्हाला नेहमी साथ देईल.
> गीतेत लिहिले आहे की, तुमच्याकडे जे आहे त्याची अतिशयोक्ती करू नका आणि इतरांचा मत्सर करू नका. दुसऱ्यांचा मत्सर करणाऱ्यांच्या मनाला कधीच शांती मिळत नाही.
> गीतेमध्ये असे म्हटले आहे की, ज्याच्या मनात अहंकार, मत्सर आणि द्वेषाच्या भावना असतात, त्या व्यक्तीचे पतन निश्चित आहे. कारण या सर्व प्रवृत्ती वाळवीसारख्या आहेत, ज्या कोणत्याही व्यक्तीला आतून पोकळ बनवतात.
> गीतेतील शिकवणीच्या मते, जीवनातील एकमेव समस्या ही माणसाची चुकीची विचारसरणी आहे. योग्य ज्ञान हे आपल्या सर्व समस्यांचे अंतिम समाधान आहे. श्रीकृष्ण म्हणतात की माणसाने कधीही आपल्या मनावर विश्वास ठेवू नये. कारण, मन प्रत्येक वेळी आपला विश्वासघात करते. प्रत्येकाने आपल्या मनाऐवजी कृतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
> श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की, प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा आधार प्रेम आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनात प्रेम असते, त्याच्याच जीवनात शांती असते, कारण शांती फक्त प्रेमात असते. जीवनात प्रेम नसेल, तर माणसाला खूप काही मिळवूनही समाधान मिळत नाही.
> गीतेत म्हटले आहे की, इंद्रियांच्या पलीकडे बुद्धी आहे आणि बुद्धीच्या पलीकडे मन आहे. त्याच वेळी, चेतना म्हणजेच आत्मा हा मनापेक्षा श्रेष्ठ आहे आणि आत्म्याशिवाय कोणतेही कार्य होऊ शकत नाही. शिक्षण असे असले पाहिजे की, त्यातून चारित्र्य घडेल. कारण, चांगल्या चारित्र्याशिवाय चांगले जीवन जगता येत नाही.
संबंधित बातम्या