Geeta Updesh: भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या ‘या’ ५ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य सुखाने भरून जाईल!-geeta updesh in marathi always remember these 5 things said by lord krishna life will be filled with happiness ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या ‘या’ ५ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य सुखाने भरून जाईल!

Geeta Updesh: भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या ‘या’ ५ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य सुखाने भरून जाईल!

Aug 26, 2024 07:47 AM IST

Geeta Updesh In Marathi: अर्जुनाच्या सर्व शंका दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने आपले विश्वरूप प्रकट केले आणि गीतेची शिकवण दिली. गीतेतील शिकवण आपल्या आजच्या जीवनातही अतिशय महत्त्वाची आहे.

Geeta Updesh In Marathi: भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या ‘या’ ५ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
Geeta Updesh In Marathi: भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या ‘या’ ५ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Geeta Updesh In Marathi: हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. या पवित्र ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादाचे तपशीलवार वर्णन आहे. महाभारताच्या युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला गीतेचा उपदेश केला होता. खरं तर, अर्जुन स्वतःच्या कुटुंबातील सदस्य, शिक्षक आणि मित्रांविरुद्ध युद्ध करण्याच्या विचाराने दुःखी झाला आणि युद्धभूमीवर गोंधळलेला देखील होता. मग, माधवाने अर्जुनाला मार्गदर्शन केले. अर्जुनाच्या सर्व शंका दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने आपले विश्वरूप प्रकट केले आणि गीतेची शिकवण दिली. गीतेतील शिकवण आपल्या आजच्या जीवनातही अतिशय महत्त्वाची आहे. या शिकवणीचा अवलंब आपल्या जीवनात करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीच अडचणी येत नाहीत. याप्रमाणेच आयुष्यात सुखी राहण्यासाठी देखील श्रीकृष्णाने काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

‘या’ ५ गोष्टी ठेवा लक्षात!

> गीतेच्या शिकवणीनुसार माणसाने नेहमी राग आणि अहंकार टाळला पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला सांगितले होते की, क्रोध हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. क्रोधाने बुद्धीचा नाश होतो आणि जेव्हा बुद्धीचा नाश होतो, तेव्हा माणूस आपले कर्तव्य नीट पार पाडू शकत नाही. क्रोधामुळे, व्यक्ती स्वतःवर नियंत्रण गमावतो, ज्यामुळे तो स्वतःचे नुकसान करून घेतो.

Geeta Updesh : कठीण प्रसंगी देव अशा प्रकारे देतो मनातली हाक, जाणून घ्या गीतेतील अनमोल विचार

> गीतेच्या शिकवणीनुसार, जीवनात घेतलेले निर्णय आणि कृती आपले भविष्य घडवतात. माधव अर्जुनला सांगतो की, आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेणे खूप महत्वाचे आहे. कारण आयुष्य एका मिनिटात बदलत नाही, तर एका मिनिटात विचार करून घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो.

> गीतेच्या शिकवणीनुसार, एखाद्या मुलाला भेटवस्तू दिली नाही, तर तो काही काळ रडतो. परंतु, जर त्याला संस्कार दिले नाहीत, तर तो आयुष्यभर रडतो. आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे. मुलांनी जीवनात आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. हे शिकवणे त्यांचे जीवन योग्य दिशेने नेण्यासाठी आवश्यक आहे.

> गीतेच्या शिकवणुकीनुसार, आपली विचारसरणी, आपली वागणूक आणि आपली कृती, देव नव्हे तर आपले भाग्य लिहिते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला समजावून सांगितले की, माणसाचे कर्मच त्याचे भाग्य ठरवते.

> गीतेच्या शिकवणीनुसार वडिलांनी दम दिलेला मुलगा, गुरूंनी रागे भरलेला शिष्य आणि सोनाराने ठोकलेले सोने हे नेहमीच सुंदर प्रकारे घडतात. सोने वितळल्याशिवाय आणि नीट घाव घातल्याशिवाय ते सुंदर दागिन्यांमध्ये बदलत नाही.