Geeta Updesh: श्रीमद् भगवद्गीता हा भारतीय धर्मग्रंथांचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. हा ग्रंथ भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादावर आधारित आहे. महाभारताचे युद्ध होण्यापूर्वी त्यांच्यात हा संवाद झाल्याचे सांगितले जाते. महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला त्यालाच गीता म्हणून संबोधले जाते. हिंदू धर्मात गीतेला अनन्यसाधारण महत्व आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेले हे उपदेश आजच्या काळातही माणसाला त्याच्या कर्तव्यांची माहिती करून देतात. आपल्याच लोकांविरोधात युद्ध करण्यापूर्वी अर्जुनाचा धीर सुटला होता. मी माझ्याच लोकांविरोधात युद्ध कसं करू शकतो असा प्रश्न त्याला पडला होता. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण अर्जुनाला देतात.
-भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात की, माणसाने कधीही अहंकारी राहू नये. अहंकार माणसाला ती प्रत्येक गोष्ट करायला लावतो जे त्याच्यासाठी योग्य नाही. शेवटी हा अहंकारच त्याच्या विनाशाचे कारण बनतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात लवकरात लवकर अहंकार सोडला पाहिजे.
-श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की, कोणत्याही व्यक्तीची अधोगती तेव्हाच होते जेव्हा तो आपल्या माणसांना खाली आणण्यासाठी अनोळखी लोकांचा सल्ला घेऊ लागतो.
-तुम्ही आनंदी आहात की दुःखी हे तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. तुम्हाला आनंदी व्हायचे असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहाल. जर तुम्ही नकारात्मक विचार आणाल तर तुम्ही दुःखी व्हाल. विचार हा प्रत्येक माणसाचा शत्रू आणि मित्र असतो.
-श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार, एखाद्याला कोणाकडून साथ मिळाली नाही तर कधीही निराश होऊ नये. कारण कुणी साथ दिली किंवा न दिली तरी प्रत्येक कठीण क्षणी देव आपल्याला साथ देत असतो.
-गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की, अत्याचार हसतमुखाने सहन केले जातात. तेव्हा देव स्वतः त्या व्यक्तीचा बदला घेतो. म्हणून, कोणत्याही परिस्थितीत हसणे थांबवू नये.
-भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अडचणी फक्त सर्वोत्तम लोकांच्याच वाट्याला येतात. कारण त्यांना उत्तम प्रकारे पार पाडण्याची ताकद फक्त त्या लोकांमध्येच असते.
-गीतेनुसार, केवळ इतरांना दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका, कारण देव तुम्हाला बाहेरूनच नाही तर आतूनही ओळखतो. त्यामुळे तुम्ही लोकांना फसवाल पण देवाला कधीच नाही.
-गीतेत लिहिले आहे की, साध्या माणसाची केलेली फसवणूक तुमच्या विनाशाची सर्व दारे उघडते. तुम्ही कितीही महान असलात तरी सामान्य माणसाची फसवणूक केल्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील.